September 12, 2025

सिंहगड किल्ला तीन दिवस बंद; अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे प्रशासनाचा निर्णय

पुणे, ३१ मे २०२५: सिंहगड किल्ल्यावर सध्या सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे पुढील तीन दिवस ( ३१ मे ते २ जून २०२५) किल्ला सर्वसामान्य नागरिक व पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पुणे वन विभागाच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे.

प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, या कालावधीत पायवाटांद्वारे गडावर येणाऱ्या पर्यटकांनाही प्रवेश नाकारण्यात येणार आहे. नागरिकांनी आणि पर्यटकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सध्या गडावर मोठ्या प्रमाणावर झालेली अतिक्रमणे हटवण्याची प्रक्रिया सुरू असून आरसीसी (रेनफोर्स्ड सिमेंट काँक्रीट) बांधकामे हटवण्यासाठी यंत्र सामग्रीचा वापर शक्य नाही. त्यामुळे ही सर्व कामे हातानेच करण्यात येत असल्यामुळे मोहिमेस अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागत आहे.

पुणे वनविभागाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून, ही कारवाई लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास ही पुणे विभागाचे उपवनसंरक्षक यांनी व्यक्त केला आहे.