पुणे, १९/०७/२०२२: पीएमपीएल बसचे ब्रेक फेल झाल्याने सहा प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची घटना पुणे-सातारा रस्त्यावरील घटना घडली. बसचालकाच्या प्रसंगावधानामुळे गंभीर दुर्घटना टळली.
कात्रज स्थानकातून लोहगावकडे जात असलेल्या पीएमपी बसचे ब्रेक धनकवडीतील राजर्षी शाहू बँकेसमोर झाले. भारती विद्यापीठ ते धनकवडीपर्यंत उतार आहे. तीव्र उतारावर ब्रेक निकामी झाल्याचे पीएमपी बसचालकाच्या लक्षात आले. त्यानंतर पीएमपी चालकाने प्रसंगावधान राखून बसचा वेग कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बस श्री शंकरमहाराज उड्डाणपुलाच्या खांबावर आदळल्याने बसचा वेग कमी झाला.
More Stories
पुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन
चित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद
प्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा