गांजाची तस्करी करणाला पाठलाग करून पकडले, पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

पुणे, २०/०८/२०२१ : भरधाव वेगात पळून जाणार्या कारला अडवून २५ किलो गांजा पकडला. यात एकाला अटक झाली आहे, तर एक जण पळून गेला. त्यांच्याकडून पावणे चार लाखाचा गांजा व १० लाखाची कार असा १३ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या आदेशानुसार उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, सहाय्यक फौजदार राजेंद्र थोरात, प्रकाश वाघमारे, मुकुंद कदम, दत्तात्रय जगताप, पोलीस हवालदार सचिन घाडगे, मुकुंद आयचीत , प्रमोद नवले पोशी प्राण येवले हे असे पुणे ते मुंबई रोडने पेट्रोलिंग करत होते. कामशेत पोलीस स्टेशनचे हद्दीत गोवित्री गावाचे जवळ आलो असता गोपनीय बातमीदारामार्फत कारमधून काही जण गांजा घेऊन जात असल्याची माहिती मिळाली.

त्या अनुषंगाने सहाय्यक पोलिस निरीक्षक आकाश पवार , पोलीस हवालदार अजय दरेकर यांचे मदतीने एक पांढरे रंगाची मारुती सुझुकी विटारा ब्रिझा गाडी भरधाव वेगात व रहदारीचे नियमाकडे दुर्लक्ष करून जोरात कोलवाडी च्या बाजूकडे जाताना दिसली. चालकाची हालचाल संशयास्पद वाटल्याने व मिळालेल्या बातमीच्या वर्णनाप्रमाणे गाडीची खात्री पटल्याने सदर वाहनास अडथळा आणून पकडले व गाडीची झडती घेतली. असता त्यामध्ये २५ किलो गांजा मिळून आल्याने गाडीतील दोन इसमपैकी गाडी चालक व मालक संजय मोहिते (रा. गोवित्री ता.मावळ) हा पळून गेला असून दुसरा इसम सनील भाऊ केदारी (रा.कोलवाडी ता. मावळ जि. पुणे) याला ताब्यात घेतले.

या दोघांवर गुन्हा दाखल करून 13 लाख 75 हजार 000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

आरोपीस वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासकामी कामशेत पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. सदर आरोपी हा सराईत असून यापूर्वी त्याचेवर 02 गुन्हे दाखल आहेत.

पुढील तपास हा पोलिस निरीक्षक संजय जगताप हे करीत आहेत.