पुणे, 6 जानेवारी 2024: पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे पीएमडीटीए मानांकन आयटीए करंडक 12 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत 12 वर्षाखालील मुलांच्या गटात सोहम ढमढेरे, अश्वथ भुजबळ, अवधूत निलाखे या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंचा पराभव करून आजचा दिवस गाजवला.
खराडी येथील इंटेनसिटी टेनिस अकादमी टेनिस कोर्टवर
आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत 12 वर्षाखालील मुलांच्या गटात दुसऱ्या फेरीत बिगर मानांकित अश्वथ भुजबळने सहाव्या मानांकित अरिंजय बांगचा 6-3 असा पराभव अनपेक्षित निकाल नोंदवला. अवधूत निलाखे याने चौदाव्या मानांकित विराज कुलकर्णीवर 6-3 असा विजय मिळवला. चुरशीच्या लढतीत सोहम ढमढेरेने पंधराव्या मानांकित अर्णव भट्टभट्टचा टायब्रेकमध्ये 7-6(5) असा पराभव करून आगेकूच केली.
निकाल: दुसरी फेरी: 12 वर्षाखालील मुले:
विराज खानविलकर (7)वि.वि.कबीर बोरसे 6-2;
आयुश मिश्रा(4)वि.वि.कियान शहा 6-1;
सोहम ढमढेरे वि.वि.अर्णव भट्टभट्ट(15) 7-6(5);
वेद परदेशी(10) वि.वि.अद्वैय पाटील 6-0;
लव परदेशी(5)वि.वि.विआन पेंडुरकर 6-1;
अश्वथ भुजबळ वि.वि.अरिंजय बांग(6)6-3;
अवधूत निलाखे वि.वि.विराज कुलकर्णी(14)6-3;
हर्ष नागवानी(3)वि.वि.शितीज प्रसाद 6-0;
रयान जॉर्ज (8)वि.वि.गौतम त्रिपाठी 6-4;
वरुण एलनकुमारन वि.वि.आरव मुदनूर 6-3.
More Stories
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत ब्लेझिंग ग्रिफिन्स संघाला विजेतेपद
संयम राखायला शिका – भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयचा नवोदितांना सल्ला
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत हॉक्स, फाल्कन्स ऑप्टिमा, सनबर्ड्स, स्पिअर्स संघांचे विजय