पुणे: धानोरी-लोहगाव परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्राधान्य : सुनिल टिंगरे

धानोरी, २०/०६/२०२१: धानोरी-लोहगाव परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यास प्राधान्य दिले जात आहे. परिसरातील प्रलंबित रस्त्यांचे विकसन करण्यासाठी अडचणी दूर केल्या जात आहेत. विकास कामे करताना आम्ही सर्व प्रतिनिधी पक्षपात विसरून  एकत्र येत काम करत असतो, याचे उदाहरण म्हणजे या रस्त्याचे मार्गी लागलेले काम होय. असे प्रतिपादन आमदार सुनिल टिंगरे यांनी रविवारी केले.

 

प्रभाग क्र. 1 (कळस – धानोरी) येथील धानोरी जकात नाका ते न्याती ईविटा डीपी रस्त्याचे तसेच मार्थोफिलिप्स शाळेजवळील पुलाचे भूमिपूजन रविवारी आमदार सुनिल टिंगरे यांच्या हस्ते करण्यात आले. सदर रस्त्याच्या विकसनामुळे पोरवाल रस्त्यावरील वाहतूक कोडींतून मुक्तता होण्यास मदत होणार आहे.

 

यावेळी बोलताना आमदार सुनील टिंगरे म्हणाले की या रस्त्यामुळे पोरवाल रस्त्याला पर्यायी रस्ता उपलब्ध झाल्याने नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. लोहगाव परिसरासाठी भामा-आसखेड योजनेचे पाणी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हा परिसर वेगाने विकसित होत आहे, येथे सर्व नागरी सुविधा उपलब्ध करण्यासाठी आम्ही सर्व पक्षीय लोक प्रतिनिधी एकत्र येऊन काम करीत आहोत.

 

प्रभागातील नगरसेवक अनिल (बॉबी) टिंगरे म्हणाले की, सदर रस्त्याबाबत अनेक वर्षापासून पाठपुरावा करीत असून हा रस्ता अंतिम टप्यात आला आहे. पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून यासाठी भरीव तरदुत उपलब्ध झाली असून सदर रस्त्यासाठी आमदार सुनील टिंगरे यांनी केलेल्या पाठपुराव्याबद्दल त्यांचे आभार मानले.

 

यावेळी नगरसेविका ऐश्वर्या जाधव, संतोष खांदवे, व रेजन्सी मेडोज, ग्लोबल मिडोज, अमेय लोटस, बी यु भंडारी, न्यायी ईविटा, प्राइड आशियाना, युनिट प्रॉस्परस व इतर सोसायटीमधील चेअरमन व रहिवासी उपस्थित होते.