पुणे, 15 ऑक्टोबर 2025: एम्पॉवर हर फाउंडेशनतर्फे आणि पीएमडीटीए, ऍथलेटिक्स बीएनबी,भारत स्पोर्ट्स इव्हॉल्युशन, मायमेंटल कोच, योल्कशायर आणि पॅरेंट्स ग्रुप यांच्या सहकार्याने आयोजित दुसऱ्या ‘एआयटीए-एमएसएलटीए एक लाख रकमेची अखिल भारतीय महिला मानांकन टेनिस स्पर्धेत एकेरीत महाराष्ट्राच्या सोनल पाटील, डेनिका फर्नांडो यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
पाषाण येथील अनिकेत वाकणकर टेनिस अकादमीच्या टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या उपांत्य फेरीत एकेरीत दुसऱ्या मानांकित महाराष्ट्राच्या सोनल पाटीलने सोलापूरच्या आकृती सोनकुसरेचा 6-1, 6-4 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत चौथ्या मानांकित महाराष्ट्राच्या डेनिका फर्नांडोने कर्नाटकच्या सहाव्या मानांकित दिशा बेहेराचा 3-6, 7-5, 6-3 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.
दुहेरीत उपांत्यफेरीत गुजरातच्या आरुषी रावळने आंध्रप्रदेशच्या चंदना पोतुगरीच्या साथीत गोव्याच्या सायशा तनेजा व छत्तीसगढच्या आनंदिता शर्मा यांचा 6-0, 6-1 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.
निकाल: मुख्य ड्रॉ: उपांत्य फेरी: महिला:
डेनिका फर्नांडो(4)(महाराष्ट्र) वि.वि. दिशा बेहेरा(6)(कर्नाटक) 3-6, 7-5, 6-3;
सोनल पाटील(2)(महाराष्ट्र)वि.वि.आकृती सोनकुसरे(महाराष्ट्र) 6-1, 6-4;
दुहेरी गट: उपांत्य फेरी:
आरुषी रावळ(गुजरात)/ चंदना पोतुगरी(आंध्रप्रदेश)वि.वि.सायशा तनेजा(गोवा)/आनंदिता शर्मा(छत्तीसगढ) 6-0, 6-1.

More Stories
गद्रे मरीन-एमएसएलटीए आयटीएफ ग्रेड 3 कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत कीर्तना रागिनेनी, नाव्या शर्मा, अव्यक्ता रायावरपू, नमित भाटिया, सक्षम भन्साळी यांचे सनसनाटी विजय
एमएसएलटीए – नवसह्याद्री क्रीडा संकूल अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशीप सिरीज(16वर्षाखालील)टेनिस स्पर्धेत रिशीता यादव हिला दुहेरी मुकुटाची संधी
एमएसएलटीए – नवसह्याद्री क्रीडा संकूल अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशीप सिरीज(16वर्षाखालील)टेनिस स्पर्धेत मयंक राजन, रोहन बजाज, रिशीता यादव, स्वरा जावळे यांचा उपांत्य फेरीत प्रवेश