पुणे, 23 ऑगस्ट 2025: एम्पॉवर हर फाउंडेशनतर्फे यांच्या वतीने आयोजित व एआयटीए, एमएसएलटीए पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या ‘एआयटीए-एमएसएलटीए एक लाख रुपयांची अखिल भारतीय महिला मानांकन टेनिस स्पर्धेत एकेरीत कोल्हापूरच्या सोनल पाटील हिने विजेतेपद संपादन केले.
डेक्कन जिमखाना क्लबच्या टेनिस कोर्टांवर व संदीप किर्तने टेनिस अकादमी, भारत स्पोर्ट्स इव्हॉल्युशन, मायमेंटल कोच, योल्कशायर तसेच संचेती हॉस्पिटल यांच्या सहकार्याने पार पडलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉ मध्ये अंतिम फेरीत दुसऱ्या मानांकित कोल्हापूरच्या सोनल पाटील हिने अव्वल मानांकित ललित्या कल्लुरी हिचा 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकावले. हा सामना १ तास 10 मिनिटे चालला. पहिल्या सेटमध्ये सोनलने सुरेख सुरुवात करत ललित्याची तिसऱ्या, पाचव्या गेममध्ये सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट ६-२ असा सहज पराभव करून विजेतेपदाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. दुसऱ्या सेटमध्येदेखील ललित्याला सूर गवसला नाही. सोनल हिने ललित्याची पुन्हा पाचव्या गेममध्ये सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट ६-३ असा जिंकून विजेतेपदावर आपले नाव कोरले. सोनल हि पीवायसी हिंदू जिमखाना येथे प्रशिक्षक हेमंत बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना करंडक व रोख रकमेची पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर, डेक्कन जिमखानाचे सचिव मिहीर केळकर आणि माजी डेव्हिस कप खेळाडू संदीप किर्तने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक संदीप नूलकर, माय मेंटल कोचचे डॉ. स्वरूप सावनूर, बीएससीचे काजल आंबेडकर, योल्कशायरचे वरद देशपांडे, अनिल कापले आणि सुपरवायझर प्रवीण झिटे आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल: मुख्य ड्रॉ: उपांत्य फेरी:
ललित्या कल्लुरी(1)(महाराष्ट्र) वि.वि.चंदना पोटुगरी(4)(आंध्रप्रदेश) 6-3, 7-6(4)
सोनल पाटील(2)(महाराष्ट्र) वि.वि.सायली ठक्कर (3)(गुजरात)6-4, 6-1;
अंतिम फेरी: सोनल पाटील(2)(महाराष्ट्र) वि.वि.ललित्या
कल्लुरी(1)(महाराष्ट्र)6-2, 6-3.

More Stories
गद्रे मरीन-एमएसएलटीए आयटीएफ ग्रेड 3 कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत कीर्तना रागिनेनी, नाव्या शर्मा, अव्यक्ता रायावरपू, नमित भाटिया, सक्षम भन्साळी यांचे सनसनाटी विजय
एमएसएलटीए – नवसह्याद्री क्रीडा संकूल अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशीप सिरीज(16वर्षाखालील)टेनिस स्पर्धेत रिशीता यादव हिला दुहेरी मुकुटाची संधी
एमएसएलटीए – नवसह्याद्री क्रीडा संकूल अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशीप सिरीज(16वर्षाखालील)टेनिस स्पर्धेत मयंक राजन, रोहन बजाज, रिशीता यादव, स्वरा जावळे यांचा उपांत्य फेरीत प्रवेश