पुणे आणि अमरावती दरम्यान कुर्डुवाडी, लातूर, पूर्णा मार्गे विशेष गाड्या

 पुणे, 03 डिसेंबर 2022: खाली दिलेल्या तपशिलानुसार प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे पुणे आणि अमरावती दरम्यान कुर्डुवाडी, लातूर, पूर्णा मार्गे विशेष गाड्या चालवणार आहे:

01439 विशेष दि. १६.१२.२०२२ ते २६.२.२०२३ या कालावधीत प्रत्येक शुक्रवार आणि रविवारी पुणे येथून २२.५० वाजता सुटेल आणि अमरावती येथे दुसऱ्या दिवशी १७.३० वाजता  पोहोचेल.

01440 विशेष गाडी दि. १७.१२.२०२२ ते २७.२.२०२३  पर्यंत अमरावती येथून दर शनिवारी आणि सोमवारी १९.५० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी १६.२० वाजता पोहोचेल.

थांबे: उरुळी, दौंड जंक्शन, जिंती रोड, जेऊर, कुर्डूवाडी जंक्शन, बार्शी टाऊन, उस्मानाबाद, लातूर, लातूर रोड, परळी वैजनाथ, परभणी जंक्शन, पूर्णा जंक्शन, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला जंक्शन, मूर्तिजापूर जंक्शन आणि बडनेरा  जं.

संरचना: एक प्रथम वातानुकूलित, एक द्वितीय वातानुकूलित, दोन तृतीय वातानुकूलित, ५ शयनयान, दोन गार्ड्स ब्रेक व्हॅनसह ८ सामान्य द्वितीय श्रेणी.

आरक्षण: 01439/01440 विशेष गाड्यांसाठी विशेष शुल्कासह बुकिंग दि. ४.१२.२०२२ रोजी सर्व PRS स्थानांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

या विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.

प्रवाशांना स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविड योग्य वर्तनाचे पालन करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.