सेंट व्हिन्सेंट हायस्कूलच्या फुटबॉल, हॉकी व बास्केटबॉल मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत बास्केटबॉल लीग स्पर्धेत अखेरच्या साखळी फेरीत सेंट व्हिन्सेंट अ संघाने फादर एग्नेल संघाचा 15-7 असा पराभव केला. विजयी संघाकडून साई शिंदे(6गुण), विहान बलाल(6गुण), पियुष मानकरी(3गुण)यांनी सुरेख कामगिरी केली. सेंट व्हिन्सेंट अ संघाने 7 सामन्यात 7 विजय, 21 गुणांसह अव्वल क्रमांक पटकावला. तर, लॉयला स्कुल संघाने 7 सामन्यात 5विजय, 2पराभव, 15गुणांसह दुसरा क्रमांक पटकावला. लॉयला स्कुल संघाने अखेरच्या लढतीत सेंट पॅट्रिक्स संघाचा 16-0 असा एकतर्फी पराभव केला.
सेंट व्हिन्सेंट अ: 15 (साई शिंदे 6, विहान बलाल 6, पियुष मानकरी 3)वि.वि.फादर एग्नेल: 7 (अरिहंत शिंदे 6, रझा सय्यद 1);
लॉयला स्कुल: 16(नीव शिंदे 2, अहान बी 2, समेर एस. 2, राम के 6, श्रेयन 4)वि.वि.सेंट पॅट्रिक्स: 0;
सेंट व्हिन्सेंट ब: 19 (निशान जाधव 8, वरद देसाई 6, दरेन डिसूझा 3, श्लोक झंकार 2)वि.वि.जेएन पेटिट: 5 (मोक्ष अग्रवाल 2, सोहम जगताप 3).
More Stories
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत ब्लेझिंग ग्रिफिन्स संघाला विजेतेपद
संयम राखायला शिका – भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयचा नवोदितांना सल्ला
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत हॉक्स, फाल्कन्स ऑप्टिमा, सनबर्ड्स, स्पिअर्स संघांचे विजय