अग्निसुरक्षा सप्ताहास सुरवात; विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन

पुणे, दि. ९ ऑक्टोबर : “आपल्या रहिवाशांच्या सुरक्षेचा काळजीपूर्वक विचार करून घरांची रचना, घरांमध्ये अग्नी प्रतिरोध इंटेरियर, अद्ययावत अग्निशमन यंत्रणा आणि वेळोवेळी घरांची, यंत्रणेची तपासणी आणि देखभाल या सर्वांमुळे अमनोरा टाऊनशिप ही देशातील सर्वोत्कृष्ट अग्निसुरक्षा यंत्रणा असलेली रहिवासी संस्था आहे,’’ असे मत पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि पुणे महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनी व्यक्त केले.

अमनोरा पार्क टाऊन तर्फे ९ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत ‘ फायर प्रीव्हेंशन वीक ‘ अर्थात अग्निसुरक्षा साप्ताह  साजरा केला जाणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन पोटाफोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (दि. ९) हडपसर येथील अमनोरा पार्क टाऊन येथे संपन्न झाले. यावेळी पीएमआरडीए चे उप – अग्निशमन अधिकारी सुजित पाटील, सिटी कॉपोरेशन प्रायव्हेट लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे, अमेनोरा पार्कटाऊन’चे संचालक जे. के. भोसले उपस्थित होते. या उपक्रमांतर्गत अग्नी प्रतिबंध या विषयावर प्रबोधन करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कविता, व्हॉट्स अप स्लोगन स्पर्धा , दृकश्राव्य सादरीकरण, विविध प्रात्यक्षिक यांचा समावेश आहे.

पोटफोडे म्हणाले, “  अग्नी सुरक्षा हा एक महत्वाचा विषय आहे. यामध्ये अग्निशमन दलाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासोबतच नागरिकांचाही सहभाग महत्वाचा आहे, कारण आगीच्या घटनेत सर्वात पहिला प्रतिसाद कोणी देत असतात, तर ते नागरिक असतात. त्यामुळे या विषयाबाबत नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करणे महत्वाचे आहे. तसेच उपलब्ध अग्निसुरक्षा यंत्रणा ही सुस्थितीत राहील आणि तिचा गैरवापर होणार नाही, याची काळजी देखील नागरिकांनी घेतली पाहिजे. त्याचबरोबर शालेय मुलांमध्ये देखील या विषयाबाबत प्रबोधन करण्याची गरज आहे. ‘’

देशपांडे म्हणाले, “ अमेनोरा टाऊनशिप येथे आम्ही अद्ययावत अग्निसुरक्षा यंत्रणांच्या सहभागाबाबत नेहमीच प्रयत्नशील असतो. भविष्यात आमच्या अग्निशमन यंत्रणेत फायर फायटिंग ड्रोन आणि फायर टॉवरचा समावेश करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.’’

कार्यक्रमात पार्क टाउन’च्या अग्निशमन केंद्राचे प्रमुख जॉबी अब्राहम यांनी उपक्रमाबाबत माहिती दिली. तर चैतन्य राठी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.