October 24, 2025

राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतली भिसे कुटुंबीयांची भेट; रुग्णालयाच्या कृतीवर व्यक्त केली नाराजगी

पुणे, ०७ एप्रिल २०२५: पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात धक्कादायक प्रकार घडला असून रुग्णालय प्रशासनाच्या मुजोरपणामुळे भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीह सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज तनिषा भिसे कुटुंबीयांची भेट घेतली आणि दीनानाथ रुग्णालयाच्या कृतीवर कडक शब्दात नाराजगी व्यक्त केली.

यावेळी चाकणकर म्हणाल्या की रुग्णाला उपचार देण्यासाठी रुग्णालयाने टाळाटाळ केली आहे. प्रत्येक मातृत्वाचे स्वप्न असतं ते आज भंग पावले आहे. त्या म्हणाल्या की त्यांच्यासोबत झालेल्या भेटीत सगळा अनुभव भिसे कुटुंबीयांनी सांगितला आहे. रुग्णांचे नातेवाईक आणि रुग्णालय प्रशासनाची माहिती ही गोपनीय असते, पण रुग्णालयाने ते समोर आणली आहे.

“रुग्णालयाला कडक शब्दात समज दिला जाणार आहे. तसेच राज्याच्या वतीने जी समिती केली आहे त्याचा अहवाल पोलिस आयुक्तालयात सादर केला जाणार आहे. पोलिसांनी जो जबाब नोंदवलं आहे त्यावर सुद्धा चर्चा केली जाणार आहे,” असे यावेळी चाकणकर म्हणाल्या.