कारागृहातील बंदी सुधारण्याच्या दृष्टीने राज्याची नेहमी अग्रेसर भूमिका- सुनील रामानंद

पुणे, दि. ०८/०८/२०२२: कारागृहातील बंदी सुधारण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याने नेहमी अग्रेसर भूमिका घेतली आहे. देशातील कारागृह सुधारणेस महाराष्ट्राने दिशा दिल्याचे मत राज्य कारागृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी व्यक्त केले. येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंदीजनांनी केलेल्या वस्तूंचे रक्षाबंधन व गणपती सणानिमित्त प्रदर्शन व विक्री उदघाटन समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कारागृह उपमहानिरीक्षक पश्चिम विभाग योगेश देसाई, येरवडा कारागृह उपअधीक्षक पल्लवी कदम उपस्थित होते.

 

रामानंद म्हणाले, कोरोनाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर कारागृह तुडुंब असल्याने सोशल डिस्टन्स कशाप्रकारे ठेवयाचे असे आवाहन होते. परंतु कारागृह प्रशासनाने एकत्रित काम करुन हे आव्हान यशस्वीरित्या पेलले आहे. त्यानंतर आता कारागृहात बंदीवानांकडून तयार केल्या जाणाऱ्या वस्तू खूपच दर्जेदार आहेत.

 

तुलनेत बाहेरील उत्पादनांपेक्षा त्याचा दर्जा चांगल्याप्रकारे आहे. दरम्यानय, कैदी सुधारणेकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक असला पाहिजे. त्यासाठी स्वातंत्र्यानंतर काळया पाण्याची शिक्षा आणि दगडखाणीत खडी फोडणे, रस्ते बांधणी करणे, इमारती उभारणे, रेल्वे लाईन कामाच्या शिक्षा बंद केल्याचे त्यांनी सांगितले.