नैसर्गिक दुर्घटना टाळण्यासाठी प्राधान्य – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

पुणे, २५ /७/२०२१ – नैसर्गिक दुर्घटना टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन महत्वाचे आहे. त्यासंदर्भात राज्यस्तरावर आपत्ती व्यवस्थापनची एक टीम नेहमीच काम करत असते. मात्र, घटना घडल्यावर आपत्ती व्यवस्थापन सुरू होण्याऐवजी संबंधित दुर्घटना टाळण्यासाठी काम करायला पाहिजे, त्यादृष्टीने मंत्रिमंडळात आम्ही आग्रह करू, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. सरहद संस्थेच्यावतीने मुवुंâदनगरमधील थ्री डी डेस्टीनेशन हॉलमध्ये कारगील विजय दिनानिमित्त गौरव पुरस्कार समारंभानंतर ते पत्रकारांसोबत बोलत होते.

वळसे पाटील म्हणाले, दरड प्रमाण भागाचा सरकारकडे अभ्यास असतो. मात्र, जी घटना घडली आहे तो भाग दरडप्रमाण नव्हता. तरीसुद्धा तिथे दगड कोसळण्याची घटना घडली. अनेक लोकांच्या जिवतेला हानी झाली. ज्यावेळेस माळीणला घटना घडली होती. तेव्हा लगेच रेस्क्यू करून लोकांना स्थिर सावरणे महत्वाचा भाग होता. माळीणचे पुनर्वसन करण्यात आले. अश्याच पद्धतीची भूमिका गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तळिये गावासंदर्भात घेतली आहे. त्यानुसार गावाचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. दरम्यान, पॉर्नप्रकरणी अटकेत असलेले अभिनेते राज कुंद्रा प्रकरणी त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. समाजात पॉर्नसारखा विषय निषिद्ध आहे. त्याच्यात कोणी चुकीचे वागत असेल तर पोलिसांनी त्यांच्याविरूद्ध कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई फक्त एकाच केसपूर्ती मर्यादित राहणार नाही, पॉर्नसारखे विषय कसे थांबवता येईल किंवा मर्यादित करता येईल याबाबतचे आमचे प्रयत्न असणार आहे, अशी प्रतिक्रिया वळसे पाटील यांनी दिली आहे.