September 12, 2025

आपल्या शूर सैनिकांना सन्मानित करण्यासाठी पुणे रेल्वे स्टेशनवर नुक्कड नाटक आणि तिरंगा यात्रा आयोजित

पुणे, १५/०५/२०२५: ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय सशस्त्र दलांच्या अदम्य शौर्य आणि धैर्याच्या सन्मानार्थ, मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने, पुणे रेल्वे स्टेशनवर नुक्कड नाटक आणि तिरंगा यात्रा आयोजित केली.

स्टेशन परिसरात सादर करण्यात आलेले नुक्कड नाटक (पथनाट्य) ऑपरेशन सिंदूरचे धैर्य आणि भावनेचे स्पष्टपणे चित्रण करते, प्रवाशांशी प्रभावीपणे जोडले जाते आणि ऑपरेशनच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करते. त्यानंतर तिरंगा यात्रा (ध्वज मार्च) झाली, ज्यामध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग दिसून आला, जो देशाच्या शूर सैनिकांशी एकता दर्शवितो.

हा कार्यक्रम विभागीय ऑपरेशन्स मॅनेजर आणि स्टेशन डायरेक्टर, संजय कुमार सिंग; विभागीय कमर्शियल मॅनेजर आणि जनसंपर्क अधिकारी, हेमंत कुमार बेहेरा; सहाय्यक ऑपरेशन्स मॅनेजर, ए. राजेश; तसेच पुणे विभागातील निरीक्षक, कर्मचारी आणि प्रवाशांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला.

अशा उपक्रमांद्वारे, पुणे विभाग सशस्त्र दलांबद्दलचा आदर आणि नागरिकांमध्ये देशभक्तीचा संदेश पसरवण्याच्या आपल्या वचनबद्धतेची पुष्टी करतो.