21व्या गुरू तेगबहादुर गोल्ड कप फुटबॉल स्पर्धेत स्ट्रायकर्स एफसी, क्रिसेंट एफसी संघांची आगेकूच

पुणे, दि.9 जानेवारी 2023: गुरू तेगबहादुर फाऊंडेशनच्या वतीने आयोजित 21व्या गुरू तेगबहादुर गोल्ड कप फुटबॉल स्पर्धेत दुसऱ्या फेरीत स्ट्रायकर्स एफसी, क्रिसेंट एफसी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून आगेकूच केली.  
 
सीओईपी मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत स्ट्रायकर्स एफसी संघाने घोरपडी यंग वन्स संघाचा 4-0 असा एकतर्फी पराभव केला. सामन्यात सुरुवातीला दोन्ही संघांनी सावध खेळ केला. 25व्या मिनिटाला सुबोध लांबाने अंशुमन रावतने दिलेल्या पासवर अफलातून गोल करुन संघाचे खाते उघडले. त्यानंतर चारच मिनिटांनी सुबोध लांबा याने आणखी एक गोल करुन संघाची आघाडी वाढवली. घोरपडी यंग वन्सच्या आघाडीच्या फळीने जोरदार प्रतिआक्रमण केले, पण त्यांना स्ट्रायकर्स संघाची बाचवफळी भेदता आली नाही. पूर्वार्ध संपण्यास दोनच मिनिटे शिल्लक असताना आकाश मोरेने गोल करुन संघाला 3-0 अशी आघाडी प्राप्त करून दिली.
 
उत्तरार्धातही स्ट्रायकर्स एफसी संघाने आपला रंगतदार खेळ सुरू ठेवला. 58व्या मिनिटाला मिलिंद गायकवाडने विशाल कुमारने चेंडूवर ताबा मिळवत गोल करून संघाच्या आघडीत आणखी एका गोलाची भर पाडली. घोरपडी यंग वन्स संघाला सामन्याच्या अखेरपर्यंत स्ट्रायकर्स एफसी संघाची बाचावफळी भेदता आली नाही. 
 
दुसऱ्या चुरशीच्या सामन्यात क्रिसेंट एफसी संघाने एक्स्ट्रीम वॉरियर्स संघाचा 3-2 असा संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली. क्रिसेंट एफसी कडून नील नेने, पार्थ सुपे, कौस्तुभ देशमुख यांनी तर, एक्स्ट्रीम वॉरियर्स कडून विवेक नाथ, साहिल रोकडे यांनी गोल केले 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: दुसरी फेरी: 
स्ट्रायकर्स एफसी: 4 (सुबोध लांबा 25 मि.(पास-अंशुमन रावत), सुबोध लांबा 29 मि.(पास-अथर्व जाधव), आकाश मोरे 43 मि.(पास-आदित्य कांबळे), विशाल कुमार 58 मि.(पास-मिलिंद गायकवाड) वि.वि.घोरपडी यंग वन्स: 0;
 
क्रिसेंट एफसी: 3(नील नेने 25मि.(पास-तनिश गायकवाड), पार्थ सुपे 25मि.(पेनल्टी), कौस्तुभ देशमुख 40मि.(पास- साई शिंदे) वि.वि.एक्स्ट्रीम वॉरियर्स: 2(विवेक नाथ 19 मि.(पेनल्टी), साहिल रोकडे 54 मि. पेनल्टी).
 
उद्याचे सामने, 10 जानेवारी 2023:
1.00 वाजता:खडकी युनाटेड  वि.अमर एफसी;
2.00 वाजता: जॉली रेंजहिल्स वि.सीएमएस फाल्कन्स अ
4.00वाजता: स्वराज एफसी वि. फातिमा इलेव्हन.