पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटयूट विद्यार्थ्यांची आत्महत्या

पुणे, ०५/०८/२०२२: पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटयूट मध्ये शुक्रवारी सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याने राहत्या खाेलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

 

अश्विन अनुराग शुक्ला (वय-३२) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून ताे मुळचा साल्वादाेर, नाॅर्थ गाेवा याठिकाणचा रहिवासी हाेता.

 

याबाबत डेक्कन पाेलीस ठाण्यात अक्समात मयताची नाेंद करण्यात आली आहे. डेक्कन पाेलीस ठाण्याचे वरिष्ठ पाेलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी सांगितले की, शुक्रवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पाेलीस नियंत्रण कक्षास लाॅ काॅलेज रस्त्यावरील एफटीआय महाविद्यालयात मुलांच्या जुन्या हाॅस्टेल मध्ये एक खाेलीत आतून बंद असून आत्महत्येचा प्रकार वाटत असल्याचे सांगितले.

 

त्यानुसार डेक्कन पाेलीसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. संबंधित ठिकाणी बी ब्लाॅक रुम क्रमांक एस-१२ च्या दरवाजाच्या वरील खिडकीतून पाेलीसांनी डाेकवून पाहिले असता सदर खाेलीत राहणाऱ्या शुक्ला या विद्यार्थ्याने खिडकीला नायलाॅनच्या दाेरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत व बाॅडी सडलेल्या अवस्थेत दिसून आली. त्यामुळे पाेलीसांनी अग्नीशामक दलाच्या जवनांना घटनास्थळी बाेलवून घेत अातून बंद असलेला दरवाजा उघडून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे. प्रथमदर्शनी सदरचा प्रकार हा गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा दिसून येत आहे. बाजूच्या खाेलीत राहणाऱ्या मुलांनी अश्विन शुक्ला यास शेवटचे मंगळवारी पाहिल्याचे सांगितले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने लिहून ठेवलेली सुसाईट नाेट अद्याप मिळून आलेली नाही. त्यामुळे नेमकी त्याने आत्महत्या काेणत्या कारणास्तव केली याचा उलगडा झालेला नाही. याबाबत अधिक तपास डेक्कन पाेलीस करत आहे.