विद्याथ्र्यांचा मोटारीला भीषण अपघात; दोघा विद्याथ्र्यांचा मृत्यू, पाच जखमी

पुणे, ४ आॅक्टोबर २०२२: वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात दोघा विद्याथ्र्यांचा मृत्यू झाला. तर पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. सर्वजण एका मोटारीतून नारायणपूर याठिकाणी देवदर्शनासाठी जात असताना सोमवारी रात्री सासवड परिसरात हा अपघात झाला.

 

गौरव लालवानी (वय-१९,रायपूर, छत्तीसगढ) आणि रचित मेहता (वय १८, रा.कलकत्ता) असे मृत्यूमुखी पडलेल्या विद्याथ्र्यांची नावे आहेत. जखमींमध्ये तीन विद्यार्थीनाचा समावेश असून एकूण पाचजण गंभीर जखमी झाले आहेत.

एमआयटी महाविद्यालयात शिक्षण घेणारे मित्र-मैत्रिणी सोमवारी रात्रीच्या सुमारास मोटारीतून नारायणपूरला जात होते. त्यावेळी भरधाव वेगात असलेल्या वाहन चालकाचे नियंत्रण सुटून कार दोन दुकानांना धडकून पलटी झाली. या अपघातात दोन विद्यााथ्र्यांचा जागीच मृत्यु झाला. तर तीन विद्यार्थीनीसह पाचजण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताप्रकरणी सासवड पोलीस तपास करत आहे.