पुणे, 12 जानेवारी 2024: इंग्लंडमधील लीड्स बेकेट विद्यापीठाच्या कार्नेगी स्कूल ऑफ स्पोर्टस मधील सुमारे 20 पदवी पूर्व विद्यार्थी आणि प्राध्यापक पुण्यातील आंबेगाव येथील आयएसएमएस ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट या संस्थेला 15 जानेवारी पासून भेट देणार आहेत.
उभय देशांमधील क्रिडा संस्कृती आणि क्रिडा सुविधांचा विकास यासाठी विद्यार्थ्यांचे आदान प्रदान करण्याकरिता आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष असून त्यांचा हा दौरा 15 दिवस चालणार आहे.
गेल्या वर्षीच्या उपक्रमाच्या यशामुळे यंदाही दौऱ्याचा कार्यक्रम भरगच्च असून त्यामध्ये क्रिकेट व फुटबॉलच्या मैत्रीपूर्ण लढती, बालेवाडी व पीडीएमबीए संकुला सारख्या भेटी, योगा प्रशिक्षणाची सत्रे, ट्रेकिंग, स्वयंसेवी संस्थांना भेटी, पुणे शहर दर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे.
आयएसएमएस इन्स्टिट्यूटच्या संचालिका शालिनी बॅनर्जी यांनी सांगितले की, गेल्या वर्षीच्या या उपक्रमाला प्रचंड यश मिळाले होते. विविध देशांना भेटी देऊन तेथील युवा क्रीडा पटूशी संवाद साधून आपल्या कौशल्यात भर घालण्याची कल्पना कमालीची यशस्वी ठरली.
त्या पुढे म्हणाल्या की, क्रीडक्षेत्रातील अशा उपक्रमांना पाठिंबा देण्याची भुमिका आजच्या स्पर्धात्मक जगामध्ये आपल्या कौशल्यात भर घालण्यासाठी निर्णायक ठरत आहेत. क्रीडा क्षेत्र हे केवळ मैदानातील कौशल्या पुरते मर्यादित नसून नेतृत्व विकास, सांघिक कामगिरी, सामाजिक विकास तसेच स्पर्धात्मक व संवादातील विकास कौशल्य या गुणांची त्यामुळे वाढ होते व परिणामी सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास साधला जाऊन त्यांना आपले लक्ष्य साध्य करण्यास बहुमोल मदत होते.
More Stories
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत ब्लेझिंग ग्रिफिन्स संघाला विजेतेपद
संयम राखायला शिका – भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयचा नवोदितांना सल्ला
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत हॉक्स, फाल्कन्स ऑप्टिमा, सनबर्ड्स, स्पिअर्स संघांचे विजय