पुणे, ३ जून २०२५ – पुण्यात यशस्वीरित्या पार पडलेली ‘सफल’ उपक्रमाअंतर्गत प्लास्टिक कचरा व्यवस्थापनावर आधारित परिपूर्ण प्रशिक्षण कार्यशाळा ही शहरातील कचरा वेचक व सफाई सेवकांना सशक्त बनविण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले. ही कार्यशाळा पुणे नॉलेज क्लस्टर फाउंडेशन (PKCF) आणि सोशल लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच पुणे महानगरपालिकेच्या (PMC) सहकार्याने आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेला श्री. आय. एस. इनामदार (मुख्य आरोग्य निरीक्षक, PMC), सौ. काकडे (आरोग्य निरीक्षक, PMC), कु. प्राजक्ता जोशी (PMC, E&Y कन्सल्टंट), श्री. श्रेयस दिलीप खाडे व डॉ. चैत्रा नारायण (PKCF, प्रकल्प समन्वयक), आणि श्री. प्रकाश पाथाडे व श्री. किरण लोंधे (सोशल लॅब) यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. त्यांनी शहरातील स्वच्छतेसाठी झटणाऱ्या या श्रमिकांची भूमिका आणि योगदान अधोरेखित केले.
पुणे नॉलेज क्लस्टर फाउंडेशन, ही पंतप्रधान कार्यालयाच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागारांद्वारे स्थापन केलेली संस्था असून पर्यावरण, सार्वजनिक आरोग्य, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, शाश्वत वाहतूक, आणि क्षमतेच्या वाढीसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात यामध्ये विशेष योगदान आहे.
सोशल लॅब ही संस्था नागरिक केंद्रित आणि माहिती-आधारित अपशिष्ट व्यवस्थापन उपाययोजनांमध्ये विशेष कार्य करते. स्वच्छ भारत अभियानाशी सुसंगतपणे, या संस्थेने देश-विदेशातील विविध संस्थांबरोबर भागीदारीतून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
सफल (SAFAL) या प्रशिक्षण कार्यशाळेअंतर्गत पुढील गोष्टींवर भर देण्यात आला:
1. प्लास्टिक प्रकार ओळखणे, त्यातही मल्टी लेयर्ड प्लास्टिक (MLP) ओळखणे
2. धोकादायक कचरा (जसे की काच, धातू) व इलेक्ट्रॉनिक कचरा वेगळा ओळखणे
3. सुरक्षेची साधने आणि दक्षता पाळणे
4. सुका-ओला कचरा वेगळा ठेवण्याचे महत्त्व व रंग-कोडिंग बिन्सची ओळख
5. टीमवर्क समजण्यासाठी भूमिका अभिनय व सहभागात्मक कृती
प्रात्यक्षिके, सहभागात्मक खेळ व सखोल माहितीपूर्ण सत्रांमुळे ही कार्यशाळा अत्यंत प्रभावी व शिक्षणदायी ठरली. सर्व सहभागी कामगारांना परावर्तित सुरक्षाजॅकेट व टोपींचा समावेश असलेली सुरक्षा किट वितरित करण्यात आली.
कार्यशाळेचा समारोप एक नव्या जोमाने, आत्मगौरवाने आणि जबाबदारीच्या भावनेने झाला. “सफल” हा उपक्रम स्वच्छ, सुरक्षित आणि शाश्वत पुण्याच्या दिशेने उचललेले एक प्रभावी पाऊल ठरले, जिथे कचरा व्यवस्थापनातील प्रत्येक हाताला योग्य प्रशिक्षण, सन्मान आणि संरक्षण मिळते.
More Stories
महापालिकेची अतिक्रमणाविरोधात धडक मोहीम; ५००० चौ.फुट बांधकाम जमीनदोस्त
Pune: प्रभाग रचनेवरून सुनावणीमध्ये गोंधळ
चांदणी चौक ते जांभुळ वाडी, जैन वसतिगृह बकोरी फाटा ते बकोरी या रस्त्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल महिनाभरात तयार करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार