पुणे, दि. १२ मे २०२१ : अंडरवॉटर डोमेन अवेअरनेस या विषयात काम करणा-या पुण्यातील मेरिटाईम रिसर्च सेंटर (एमआरसी) च्या वतीने सागरी उद्योगात करिअर करू इच्छिणा-या विद्यार्थ्यांसाठी खास ‘समर इंटर्नशिप’चे आयोजन करण्यात आले आहे. नीरध्वनी टेक्नॉलॉजी प्रा. लि. (एनडीटी) यांच्या सहकार्याने आयोजित या ऑनलाईन इंटर्नशिपमध्ये देशभरातील विद्यार्थ्यांबरोबरच या क्षेत्रात काम करणा-या तरुण व्यावसायिकांना देखील अर्ज करता येणार असल्याची माहिती मेरिटाईम रिसर्च सेंटरचे संचालक डॉ. (कमांडर) अर्नब दास यांनी दिली आहे.
याविषयी अधिक माहिती डॉ. दास पुढे म्हणाले, “भारताच्या सागरी क्षेत्राचा विचार केल्यास सध्या केंद्र सरकारच्या वतीने ‘सागर व्हिजन’ या संरक्षणात्मक प्रकल्पाबरोबरच सागरमाला, देशांतर्गत जलवाहतूक, जल संसाधन व्यवस्थापन, समुद्राच्या अंतर्गत भागात करण्यात येणारे खनन, मस्त्यव्यवसाय वाढीचे प्रयत्न याबरोबरच शाश्वत सागरी अर्थव्यवस्था यांवर भर देण्यात येत आहे. मात्र, असे असले तरीही सागरी उद्योग व त्यातील व्यवसायाच्या संधी या बद्दल आपल्याला फारसे माहित नसते. याउलट या क्षेत्रातील माहितीमुळे अनेक परदेशी कंपन्या त्यांच्या देशातील मनुष्यबळ घेऊन या क्षेत्रात कार्यरत कार्यरत आहेत. त्यामुळे यामधील उद्योगाच्या संधींचा फायदा भारतातील जास्तीत जास्त तरुण व काहीतरी नवे करण्याची इच्छा असणा-या व्यावसायिकांना व्हावा, या उद्देशाने आम्ही ऑनलाईन समर इंटर्नशिप सुरु करीत आहोत.”
एमआरसीच्या या इंटर्नशिपमध्ये सहभागी होण्यासाठी अर्जदार हे किमान पदवीच्या तिसऱ्या वर्षात शिकत असणारे व मुख्य विषयांचे सखोल ज्ञान असणारे असायला हवेत. याबरोबर अर्जदाराला आपल्या स्वत:च्या सविस्तर माहितीसोबत ही इंटर्नशिप का करायची आहे याविषयी माहिती द्यावी लागेल. या माहितीच्या आधारे त्यांचे मूल्यांकन होऊन तज्ज्ञांसोबत त्यांची मुलाखत पडेल व या मुलाखतीत उत्तीर्ण झाल्यानंतरच त्यांना इंटर्नशिपसाठी सहभागी करून घेण्यात येईल. एमआरसी व एनडीटीच्या वतीने २०१७ सालापासून ही इंटर्नशिप घेण्यात येत असून यामध्ये पदवीधर, पदव्युत्तर पदवी व पीएचडी झालेल्या देशभरातील तब्बल २०० विद्यार्थी व विविध संस्थांतील तरुण व्यावसायिकांनी आजवर सहभाग घेतला असल्याची माहिती देखील या वेळी डॉ. दास यांनी दिली.
इंटर्नशिपनंतर सहभागी विद्यार्थ्यांना मानधनासोबतच ‘युडीए प्रोजेक्ट फेलोशिप’ (एक सत्र) व ‘युडीए रिसर्च फेलोशिप’ (एक वर्ष) देण्यात येईल. त्याचप्रमाणे प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला प्रशस्तीपत्रक व त्यांनी केलेल्या प्रकल्पांचा उल्लेख असलेले सन्मानपत्र देखील प्रदान करण्यात येणार आहे.
यासाठी अर्ज करण्यासाठी इच्छुकांनी एमआरसीच्या संकेतस्थळाला भेट द्यावी अथवा https://mrc.foundationforuda.
More Stories
अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ रेल्वे मार्गाच्या सुधारित खर्चास मान्यता
औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचे नाव बदलण्यास राज्य सरकारची मान्यता
पीएमपीएमएलतर्फे ‘मी पीएमपीएमएलचा प्रवासी’ स्पर्धेचे आयोजन