पुणे, ११ डिसेंबर २०२२ ः भाजपचे मंत्री, पदाधिकारी, राज्यपाल यांच्याकडून वारंवार महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले जात आहेत. या विरोधात मंगळवारी (१३ डिसेंबर ) पुकारण्यात आलेल्या पुणे बंदला मुस्लिम समाजाने पाठिंबा दिला आहे. ४० मुस्लिम संघटना या बंदमध्ये सहभागी होणार आहेत.
आज या संदर्भात लेडी हवाबाई शाळा बाबाजान दर्गा कॅम्प या ठिकाणी समन्वय समिती सोबत संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, शिवप्रेमी संतोष शिंदे, प्रशांत जगताप, अरविंद शिंदे, संजय मोरे आदी यावेळी उपस्थित होते.
या सर्वांच्या उपस्थितीत मुस्लिम बांधव 13 डिसेंबरच्या बंद मध्ये सामील होण्याची घोषणा व तसा अधिकृत पाठिंबाचा पत्र त्या ठिकाणी दिले आहे.
छत्रपती शिवाजी मार्केट व्यापारी संघटना, जमाते इस्लामी हिंद, जमियत उलेमा हिंद, जमीयतूल कुरेश, एम आय एम, ॲक्शन कमिटी, उम्मत सामाजिक संस्था, शाहीन फ्रेंड सर्कल, नदाफ पिंजारी मन्सुरी जमात, पुणे एनजीओ फेडरेशन, बजमे इस्लाहा, इंडियन मुस्लिम फ्रंट, बजमे रेहेबर, फैजाने रजा, कोंढवा सोशल फाउंडेशन, होकर संघटना, शेरे हिंद फौंडेशन, अल कुरेशी यंग सर्कल,
इत्यादी संघटनाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते व स्वतः बंदचे मुख्य आयोजकांना पत्र दिले.
More Stories
पुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन
चित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद
प्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा