औंरंगाबाद, दि 13 नोव्हेंबर 2022: ईएमएमटीसी तर्फे आयोजित व एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली ईएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत सूर्या काकडे , हृतिका कपले व ध्रुवी अद्यंथया यांनी मानांकीत खेळाडूंचा पराभव करत मुख्य फेरीत प्रवेश केला.
ईएमएमटीसी टेनिस कॉम्प्लेक्स औंरंगाबाद येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत मुलांच्या गटात बिगर मानांंकीत सूर्या काकडेने तिस-या मानांकीत अहान शेट्टीचा 1-6, 6-3, 6-4 असा पराभव करत मुख्य फेरीत प्रवेश केला. अव्वल मानांकीत अथर्व शुक्लाने स्मित उंद्रेचा 6-3, 6-0 असा तर दुस-या मानांकीत नील केळकरने वरद उंद्रेचा 7-5, 4-6, 6-3 असा पराभव करत मुख्य फेरीत प्रवेश केला.
मुलींच्या गटात बिगर मानांकीत महाराष्ट्राच्या हृतिका कपलेने कर्नाटकच्या अव्वल मानांकीत सना सेश वरधमणीचा 6-0, 6-0 असा एकतर्फी लढतीत पराभव केला. ध्रुवी अद्यंथया हिने नवव्या मानांकीत दिया अग्रवालचा 6-4, 6-2 असा पराभव करत मुख्य फेरीत प्रवेश केला. दुस-या मानांकीत सृष्टी किरण हिने सृष्टी सूर्यवंशीचा 6-2, 6-2 असा तर पाचव्या मानांकीत आहिदा सिंगने सहाना कमलाकन्ननचा 6-2, 6-3 असा पराभव करत मुख्य फेरी गाठली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम पात्रता फेरी: मुले:
अथर्व शुक्ला(महाराष्ट्र)(1) वि.वि स्मित उंद्रे (महाराष्ट्र) 6-3, 6-0
नील केळकर(महाराष्ट्र) (2) वि.वि वरद उंद्रे (महाराष्ट्र) 7-5, 4-6, 6-3
सूर्या काकडे (महाराष्ट्र) वि.वि अहान शेट्टी (महाराष्ट्र)(3) 1-6, 6-3, 6-4
वीर महाजन (महाराष्ट्र)(4) वि.वि आरुष जोशी(महाराष्ट्र) 6-1, 6-2
वनिज पोथुनूरी(तेलंगणा) (5) वि.वि आरव गुप्ता(उत्तर प्रदेश) 6-0, 3-6, 6-0
अयान शेट्टी (महाराष्ट्र)(6) वि.वि महिजित प्रधान (9)(महाराष्ट्र) 6-7(6), 7-5, 6-3
आराध्या म्हसदे (महाराष्ट्र) वि.वि ओमेश औटी (महाराष्ट्र) 6-2, 3-6, 6-2
अर्जुन परदेशी (महाराष्ट्र) वि.वि प्रज्ञेश शेळके (महाराष्ट्र) 6-3, 6-2
मुली:
हृतिका कपले (महाराष्ट्र) वि.वि सना सेश वरधमणी (कर्नाटक)(1) 6-0, 6-0
सृष्टी किरण (कर्नाटक)(2) वि.वि सृष्टी सूर्यवंशी (महाराष्ट्र) 6-2, 6-2
ध्रुवी अद्यंथया (महाराष्ट्र) वि.वि दिया अग्रवाल(महाराष्ट्र) (9) 6-4, 6-2
आहिदा सिंग(कर्नाटक) (5) वि.वि सहाना कमलाकन्नन(तमिळनाडू) 6-2, 6-3
More Stories
पुणे विद्यापीठाचे ३० जानेवारीचे पेपर ५ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार
पीएमडीटीए-महाराष्ट्र मंडळ ब्राँझ सिरिज 2023 टेनिस स्पर्धेत नीरज जोर्वेकर, रणवीर गुंड, आयुष कौशल यांचा दुस-या फेरीत प्रवेश
पुणे: दौंडमधील सामूहिक हत्याकांड प्रकरणात आरोपींनी वापरलेली वाहने जप्त, सामुहिक हत्याकांड प्रकरणात आरोपींची चौकशी सुरू