राष्ट्रवादीतर्फे ‘स्वराज्य ते सुराज्य’ रॅली संपन्न; शेकडो कार्यकर्ते सहभागी

पुणे, ११ जानेवारी २०२३ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजित स्वराज्य ते सुराज्य रॅली लाल महाल ते स्वामी विवेकानंद स्मारकापर्यंत काढण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते .महापुरुषांच्या नावांनी दिल्या जाणाऱ्या घोषणांमुळे हा परिसर दणाणून गेला होता.
राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवरायांमार्फत स्वराज्याची स्थापना केली ,त्या राजमाता जिजाऊंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या लाल महाल येथून प्रारंभ झालेली ही रॅली सुराज्याचे प्रणेते असलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या स्मारक स्थळापर्यंत काढण्यात आली.
या रॅली मध्ये तरुणाईचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता यावेळी सर्वांना स्वराज्याचे रक्षण करत सुराज्यासाठी प्रतीज्ञा करण्यात आली.

राजमाता जिजाऊ आईसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू आंबेडकर आणि स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यस्मृतींना स्मरुन आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक-युवती-पदाधिकारी व कार्यकर्ते शपथ घेतो की, स्व यशवंतराव चव्हाण साहेब आणि आमचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारांतून प्रेरणा घेत भारताचे नागरीक म्हणून आमच्या संवैधानिक हक्क आणि कर्तव्यासाठी सदैव कार्यरत राहू.या देशाची धर्मनिरपेक्ष, समाजवादी वीण कायम ठेवू.आम्ही आमच्या अस्मितेची जपणूक करीत असताना या देशाच्या विविधतेतून एकतेची परंपरा कायम राखली जाईल याची दक्षता घेऊp. या देशातील सौहार्द, एकोपा आणि सद्विवेक यांच्या विरोधातील कोणत्याही शक्तीपुढे आम्ही न झुकता तिचा प्राणपणाने प्रतिकार करु. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते या देशातील राष्ट्रपुरुषांचे विचार तथा स्वातंत्र्यलढ्यातून तावून सुलाखून लाभलेल्या स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी आयुष्यभर काम करण्याची प्रतिज्ञा घेत आहोत.
तसेच यावेळी “होय आम्ही कठीबद्ध आहोत….

शिवराय – फुले – शाहू -आंबेडकर यांचा लोककल्याणकारी वसा आणि वारसा पुढे चालवण्यासाठी….” , “होय आम्ही कटिबद्ध आहोत….
युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी….” , “होय आम्हीहोय आम्ही कटिबद्ध आहोत….
कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी…” , “कटिबद्ध आहोत….
सशक्त युवा पिढी निर्माण करण्यासाठी….” , “होय आम्ही कटिबद्ध आहोत….
देशाच्या उज्वल भविष्यासाठी….” अश्या सर्व घोषणांनी रॅलीचा संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.

“आपल्या देशासह महाराष्ट्रातील सध्याचे वातावरण पाहता स्वराज्याचे आदर्श घेऊन पुन्हा एकदा सुराज्याची स्थापना व्हावी , अश्याच प्रकारचे आहे. नको त्या गोष्टींवरून वाद निर्माण केले जात आहेत, सर्वसामान्य रयतेच्या मनातील, लोकांच्या गरजेच्या अनेक प्रश्नांना बगल देत, चुकीचा इतिहास दाखवत, इतिहासावरून संभ्रम निर्माण केला जात आहे. यामध्ये स्वराज्य आणि सुराज्य या दोन्ही गोष्टीच्या मूळ हेतूला बगल देत राजकारणासाठी इतिहास बदलून आपल्या फायद्याचा राजकीय इतिहास लिहिला जात आहे. अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा सर्वांना स्वराज्य व सुराज्य यांची आठवण करून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती – युवा दिनाच्या पूर्वसंध्येला अश्या प्रकारच्या रॅलीचे आयोजन केले असल्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.
रॅलीप्रसंगी प्रशांत जगताप , प्रवक्ते प्रदीप देशमुख ,मूणालिनी वाणी , किशोर कांबळे , विक्रम जाघव ,सुषमा सातपुते , महेश शिंदे , गणेश नलावडे , उदय महाले , संतोष नांगरे , शंतनू जगदाळे , अजिंक्य पालकर , मनोज पाचपुते ,शुभम माताळे , वेणू शिंदे , शालिनी जगताप आदी यात सहभागी झाले होते.