पुणे, ३१ मे २०२५: पुण्यातील स्वारगेट येथील मुकुंदनगर भागात सुर्यमुखी चंदनी आंबा माता मंदिरातील दानपेटी मधून रोख रक्कम चोरी करणाऱ्या चोरट्याला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. या चोरीचे सीसीटीव्ही देखिल समोर आले आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी महादेव तुकाराम गिरमकर (४२) या चोरट्याला अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वारगेट पोलीस ठाणे हद्दीमध्ये २३ मे रोजी पहाटे ४.३० सुमारास एका अज्ञात चोरटयाने मुकुंदनगर येथील सुर्यमुखी चंदनी आंबा माता मंदिराचा दरवाजा तोडुन मंदिरातील दानपेटी मधील रोख रक्कम चोरी केली होती. त्यावरुन मंदिर कमिटीच्या तक्रारीवरुन स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्ह्यातील आरोपी हा घटनास्थळावरील सीसीटिव्ही फुटेजमध्ये दिसुन आल्याने या आरोपीचा शोध घेण्यात येत होता.
काल सकाळी (३० मे) १०.०० वाजण्याच्या सुमारास स्वारगेट बस स्टँड येथे सीसीटीव्ही फुटेज मध्ये सदर आरोपी दिसला. त्याला ताब्यात घेवून त्याची चौकशी करण्यात आली. यावेळी सदर इसम त्याच्याकडील पिशवीस सारखा हात लावुन पिशवी पाठीमागे लपवत असल्याचे दिसुन आले. तेव्हा त्या स्थितीत अंगझडती घेतली असता त्याचे पिशवीमध्ये रोख रक्कम, लोखंडी हातोडी, कटावणी, स्कु ड्रायव्हर व दोन एक्सा ब्लेड अशी हत्यारे सापडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीस सदर रोख रक्कम व हत्यांरासह पुढील कारवाईकामी पंचासह स्वारगेट पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले व त्याचा अधिक कसुन तपास केला. आरोपीने सांगितले की, मागील आठवडयात त्याने मुकुंदनगर येथील देवाच्या मंदिरामध्ये चोरी केली असुन सदर रक्कम दान पेटीमधील असल्याची त्यांनी कबुली दिली. तपासा दरम्यान आरोपीकडून कडुन ३८,४००/- रुपये रोख रक्कम व मंदिरामध्ये चोरी करणेकामी वापरलेली हत्यारे जप्त करुन दाखल गुन्हा उघडकीस आणला आहे.
आरोपीविरूद्ध गुन्हे दाखल केले असून अटक देखील करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

More Stories
‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’ – मुरलीधर मोहोळ
पुणे ः अवैध मद्य तस्करीविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; ४८ लाखांचा मुद्देमाल जप्त
महापालिका निवडणुकीसाठी प्रशासन ‘तत्पर मोड’ वर; संपूर्ण तयारी सुरू