टाटा महा ओपन 14 वर्षांखालील चॅम्पियनशिप सिरिज 2022 स्पर्धेत देशभरातून 150 खेळाडूंचा सहभाग

पुणे 18 नोव्हेंबर 2022: बाऊन्स टेनिस अकादमी, पीएमडीटीए आणि पुणे पॅरेंट्स यांच्या तर्फे आयोजित, टाटा महा ओपनच्या सहकार्याने व एआयटीए एमएसएलटीए, पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या टाटा महा ओपन अखिल भारतीय मानांकन 14 वर्षांखालील  चॅम्पियनशिप सिरिज 2022 स्पर्धेत देशभरातून 150 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा सनी वर्ल्ड टेनिस कोर्ट, पाषाण सुस रोड या ठिकाणी 19 ते 25  नोव्हेंबर  2022 या  कालावधीत होणार आहे. 
 
स्पर्धा संचालक गौरव चतुर यांनी सांगितले की, स्पर्धेत महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, दिल्ली, हरियाणा, उत्तरप्रदेश, तामिळनाडू, मध्य प्रदेश, ओडिसा आणि राजस्थान या ठिकाणांहून 150 हून अधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे.
 
 स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी  प्रणव वाघमारे यांची सुपरवायझर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.