तरुणीला अश्लिल मेजेस पाठवून त्रास देणाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा

पुणे, ता. १२ मे २०२१: तरूणीचा पाठलाग करून तिला सतत त्रास देत अश्लिल मेसेज नातेवाईकांना पाठविणाऱ्या व्यक्तीवर हडपसर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत ३२ वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. त्यानुसार अमित मोरे (वय ३६, रा. उंड्री, हवेली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जानेवारी ते एप्रिल २०२१ दरम्यान ही घटना घडली.

पिडीत तरुणी रस्त्याने-जाताना येताना आरोपी हा अगोदर छुपा पाठलाग करत होता. त्यानंतर सतत पाठलाग करून तरूणीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागला. तरूणीला रस्त्यात आडवून हात धरत प्रेमाची मागणी घालू लागला. तरुणीने नकार दिल्यानंतर स्वतः च्या जीवाचे बरेवाईट करण्याची धमकी त्याने दिली. तरुणीने नकार दिल्यानंतरी आरोपी तरुणीला अश्लिल मेसेज पाठवून तिला त्रास देत होता. तसेच, तरुणीच्या बहिन व इतर नातेवाईकांना अश्लिल मेजस पाठवून तिची बदनामी केली. या आरोपीचा त्रास सहन न झाल्यानंतर तरुणीने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. याप्रकरणी हडपसर पोलिस अधिक तपास करत आहेत.