दुचाकी आडवी लावून वाहनचालकाला लुटले

पुणे, 11 ऑक्टोबर 2022 : दुचाकीला कट मारल्यावरून वाद घालत वाहनचालकाला अडवून त्याच्या खिशातील ८ हजारांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना ४ ऑक्टोबरला कदमवाक वस्ती परिसरात घडली.

याप्रकरणी दिपक हंडाळ (वय २६) याला अटक केली आहे. गणेश सातव (वय २७) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

गणेश हे पिकअप टेम्पो घेऊन जात असताना दिपकने त्याच्या वाहनाला दुचाकी आडवी लावून थांबवले. त्यांच्याशी दुचाकीला कट मारल्यावरून वाद घालत शिवीगाक् केली. मारहाण करून त्यांच्या खिशातील ८ हजारांची रोकड चोरून नेली. पोलीस उपनिरीक्षक हनुमंत तरटे तपास करीत आहेत.