पुणे, 30 ऑक्टोबर 2025: द पूना क्लब लिमिटेड आणि पीवायसी हिंदू जिमखाना या पुण्यातील प्रतिष्ठित अशा क्रीडा संस्थांच्या वतीने येत्या 1 व 2 नोव्हेंबर रोजी पहिल्या पूना क्लब पीवायसी पिकल बॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. पूना क्लब जलतरण संकुलात असलेल्या पिकल बॉल कोर्टवर होणाऱ्या या स्पर्धेतून खिलाडूवृत्ती, बंधुभाव आणि परस्पर संबंध यांचे दर्शन घडणार आहे.
या स्पर्धेत दोन्ही क्लबच्या मिळून 40 दुहेरी जोड्या खेळणार आहेत. मिश्र दुहेरी फॉरमॅट मध्ये होणाऱ्या या स्पर्धेतून दोन्ही क्लबमधील स्पर्धात्मकतेपेक्षा त्यांच्या समुच्चयाचे दर्शन घडणार आहे. या स्पर्धेचे सामने सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत होणार आहेत. तसेच, ही स्पर्धा 3 वयोगटात होणार असून यामध्ये 16 ते 32 वयोगट, 33 ते 50 वयोगट आणि 50 वर्षांवरील गटात होणार आहे.
अत्यंत आगळ्या वेगळ्या अशा उपक्रमाला पुसाळकर फाउंडेशन यांचे मुख्य प्रायोजकत्व लाभले असून हॉस्पिटॅलिटी पार्टनर म्हणून द हायस्पिरिटस कॅफे, तर हेल्थ पार्टनर म्हणून जहांगीर हॉस्पिटल यांचा पाठिंबा लाभला आहे. स्पर्धेचे समन्वयक संचित दिवाडकर आणि नंदन डोंगरे यांनी या स्पर्धेच्या आयोजनासाठी सर्व सभासदांमध्ये असलेला उत्साह वर्णन केला.
संचित दिवाडकर म्हणाले की, केवळ पूना क्लब विरुद्ध पीवायसी अशी स्पर्धा नसून दोन्ही क्लबमधील खेळाडू एकत्र येऊन क्रीडा महोत्सव साजरा करणार आहे. या स्पर्धेमुळे पुण्यात प्रथमच दोन क्लबमधील सहकार्याचा नवा अध्याय सुरू होणार आहे.
नंदन डोंगरे म्हणाले की, पिकल बॉल हा जागतिक स्तरावर सर्वात वेगाने लोकप्रिय होणारा क्रीडा प्रकार आहे. लोणी क्लबच्या या संयुक्त प्रयत्नांमुळे खेळाडूंमधील बंधुभाव वाढीस लागण्यास मदत होणार आहे.
पुना क्लब पीवायसी पिकल बॉल स्पर्धेमुळे दोन क्लब मधील विविध क्रीडा प्रकरण मध्ये भविष्यातही अशा स्पर्धा होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. टेनिस बॅडमिंटन आणि टेबल टेनिस या तीन क्रीडा प्रकारांमध्ये अशाच स्पर्धा घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे. पुण्यातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठेचा आशा या दोन क्लब मधील संयुक्त स्पर्धेमुळे केवळ क्रीडांगणावरच नव्हे तर बाहेरही दोन क्लब मधील संबंध अधिक मजबूत व जिव्हाळ्याचे होतील असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

More Stories
पहिल्या पुना क्लब व पीवायसी पिकल बॉल स्पर्धेत क्रिश शहा व अंगद ओबेरॉय, नित्या शहा व एरॉन थवानी यांची आगेकूच
दुसऱ्या पुना क्लब ओपन गोल्फ स्पर्धेत तिसऱ्या फेरीअखेर युवराज संधू आघाडीच्या स्थानावर
दुसऱ्या पुना क्लब ओपन गोल्फ स्पर्धेत शौर्य भट्टाचार्य व युवराज संधू संयुक्तपणे आघाडीवर