अग्निशमन दलाचे कर्तव्यदक्ष अधिकारी आणि जवान यांची तत्परता… अन् धोका टळला

पुणे, 24 ऑक्टोबर 2022: पुणे – शहरात व सर्वञ दिवाळी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असताना अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान कायमच सतर्क असल्याचे नेहमीच त्यांच्या विविध कामगिरीतून दिसून येते. अशीच विषेश कामगिरी आज लक्ष्मीपुजनाच्या दिवशी दलाचे वरिष्ठ अधिकारी व त्यांच्या वाहनचालकाने चोख बजावत आपले कर्तव्य चोख पार पाडले.

घटना अशी की, दिनांक २४•१०•२०२२ रोजी अग्निशमन मुख्यालयात कार्यरत सहाय्यक विभागीय अधिकारी रमेश गांगड व त्यांचे वाहनचालक शाहनवाज सय्यद धानोरी अग्निशमन केंद्र येथे आपल्या निवासस्थानी दलाच्या जीपमधून जात असताना दुपारी ०३•२२ वाजता धानोरी, भैरवनगर, रस्ता क्रमांक १० येथे एका सीएनजी गॅस असलेल्या रिक्षामधून (क्रमांक एमएच१२ एफझेड ५८३३) मोठ्या प्रमाणात वायू गळती होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सदर रिक्षेजवळ बरेच नागरिक जमले असल्याने व वाहतुक थांबल्याने अधिकारी गांगड यांनी तातडीने नागरिकांना बाजूला केले. त्याचवेळी सुरक्षेच्या कारणास्तव त्यांच्या वाहनातील अग्निरोधक उपकरण वाहनचालक सय्यद यांनी घेऊन त्या रिक्षेमधील इंजिन वा इतरञ कोठे काही आग किंवा धुर याची पाहणी करत तसेच विषेश धोका असलेली एक छोटी फटाक्याची पिशवी लगेच दुर केली व पुढील अनर्थ टाळला. रिक्षाचालक हा तेथे आढळून आला नाही. सीएनजी वायू गळती पुर्ण थांबताच व धोका नसल्याची खाञी करुन रिक्षा रस्त्याच्या कडेला घेऊन आणि वाहतुक सुरळीत करुन घटनास्थळावरुन पुढे रवाना झाले.

“रिक्षेमधून मोठी वायुगळती होऊन आवाज येत होता. तेथून जाताना घटना पाहून मी व माझ्या वाहनचालकाने आमचे काम केले आहे. रिक्षामधे पॅसेंजर असल्याचे समजले. कारण सीटवर एका पिशवीत लहान मुलांची फटाक्याची पिस्तुल व छोटे फटाके होते.”

– रमेश गांगड, सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी, अग्निशमन दल, पुणे.