अग्नीवर भरती प्रकियेचा निकाल घोषित

पुणे, 23 नोव्हेंबर 2022 : भारतीय लष्करामध्ये अग्नीपथ योजनेंतर्गत अग्नीवर भरतीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे पार पडलेल्या ‘अग्नीवीर भरती’ मेळाव्यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे निकाल https://joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला असून उमेदवारांनी पुणे क्षेत्रीय भरती कार्यालयात २६ नोव्हेंबर पर्यंत हजर होऊन कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अग्नीवीर जनरल ड्युटी, अग्नीवीर टेक्निकल, अग्नीवीर क्लर्क/स्टोअरकीपर आणि अग्नीवीर ट्रेड्समन या पदांसाठी २३ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर २०२२ दरम्यान ही भरती प्रक्रिया पार पडली. या भरती मेळाव्यामध्ये पुण्यासह अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद, बीड आणि सोलापूर जिल्ह्यातील उमेदवारांनी सहभाग घेतला होता, अशी माहिती भरती क्षेत्रीय कार्यालय पुणेचे संचालक मनिष कर्की यांनी दिली आहे.