मगरपट्टा सिटीत जेष्ठाची चेन हिसकाविली

पुणे, दि. 16 मे 2021: रस्त्याने पायी चाललेल्या एका जेष्ठ नागरिकाच्या गळ्यातील ७० हजारांची सोन्याची चेन दुचाकीस्वार चोरट्याने हिसका मारून तोडून नेली. ही घटना काल संध्याकाळी सहाच्या सुमारास मगरपट्टा सिटीतील आयरिसएम इमारतीच्या रस्त्यावर घडली. श्रीमंत हुलसुरे (वय ६१) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार संध्याकाळी सहाच्या सुमारास श्रीमंत आयरिसएम इमारतीच्या रस्त्यावर चालत होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ७० हजारांची सोन्याच चेन हिसका मारून तोडून नेली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक एच. गायकवाड तपास करीत आहेत.