रंगआंधळेपणाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी एसटी महामंडळाला गंडविले, चालकाला अटक

पुणे, दि. २१ मे 2021: राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी ) चालक पदासाठी रंगआंधळेपणाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी डमी व्यक्तीला उभे करून महामंडळाची फसवणूक करणाNया चालकाला खडकी पोलिसांनी अटक केले आहे. ही घटना १९ मे ला बोपोडीतील भाउ पाटील रस्त्यावर घडली. रतन संपत्ती लगड (वय ४२, रा. तेलगाव बुद्रूक, धारूर बीड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सोमनाथ तिकोटकर (वय ४८) यांनी खडकी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयात सोमनाथ तिकोटकर वरिष्ठ सुरक्षा व दक्षता अधिकारी आहेत. आरोपी रतन लगड याने रंगआंधळेपणाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केली. त्यामध्ये लगड याने स्वतःचे आधारकार्ड, बीडमधील आरटीओ लायसन्समध्ये पेâरफार केला. त्यानंतर एसटी महामंडळाकडून रंगआंधळेपणाच्या प्रमाणपत्रासाठी आवश्यक तपासणीला स्वतः हजर न राहता डमी व्यक्तीला उभे केले. त्यानंतर संबंधित प्रमाणपत्र मिळवून एसटी महामंडळाची फसवणूक केली आहे. त्याशिवाय पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शैलेजा शिंदे तपास करीत आहेत.