ऑक्सिजन एक्सप्रेस द्वारे देशभरात द्रवरूप मेडिकल ऑक्सिजनच्या पुरवठ्याने 15000 मेट्रिक टनचा टप्पा ओलांडला

नवी दिल्‍ली, 23 मे 2021: सर्व अडथळ्यांवर मात करत  नवीन उपाय शोधून भारतीय रेल्वे द्रवरूप  मेडिकल ऑक्सिजन (एलएमओ) देशभरातील विविध राज्यात पोहचवून दिलासा द्यायचा प्रयत्न करत आहे. आतापर्यंत, भारतीय रेल्वेने देशातील विविध राज्यांत 936 हून अधिक टँकरमधून 15,284 मेट्रिक टन पेक्षा अधिक  एलएमओ वितरण केले आहे.

आतापर्यंत 234 ऑक्सिजन एक्सप्रेसने आपला प्रवास  पूर्ण केला आहे आणि विविध राज्यांना दिलासा दिला आहे.

ही बातमी प्रसिद्ध होईपर्यंत  9 ऑक्सिजन एक्सप्रेस 31 टॅंकरमधून 569 मे.टन पेक्षा जास्त एलएमओ घेऊन प्रवास करत आहेत .

ही बातमी प्रसिद्ध  होईपर्यंत महाराष्ट्रात 614 मे.टन ऑक्सिजन वितरित करण्यात आला  आहे.

ऑक्सिजन एक्सप्रेस विना अडथळा वेगाने जाव्यात यासाठी रेल्वेमार्ग  खुला ठेवला जातो आणि उच्च सतर्कता ठेवली जाते.

हे सर्व अशा प्रकारे केले आहे की इतर मालवाहतूकची गती कमी होणार नाही.

ऑक्सिजन एक्स्प्रेस चालवणे हा एक अतिशय गतिमान उपक्रम  आहे आणि आकडेवारी प्रत्येक वेळी अद्ययावत केली जाते . आणखी ऑक्सिजन घेऊन ऑक्सिजन एक्सप्रेस आज  रात्री उशिरा  प्रवास सुरू करण्याची शक्यता  आहे.