जागतिक आरोग्य संघटनेने B.1.617 या सध्या चिंताजनक समजल्या जाणाऱ्या विषाणूच्या प्रकाराला “भारतीय प्रकार” म्हटलेले नाही

नवी दिल्‍ली, 12 मे 2021: कोरोना विषाणूच्या B.1.617 या प्रकाराचा समावेश जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक चिंताजनक प्रकारामध्ये केल्याचे वृत्त अनेक प्रसारमाध्यमांमधून प्रसिद्ध झाले आहे. यापैकी काही माध्यमांनी B.1.617 हा कोरोना विषाणू म्हणजे “भारतीय प्रकार” असल्याचे म्हटले आहे. मात्र, हे वृत्त पूर्णपणे चुकीचे आणि निराधार आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूच्या B.1.617 या प्रकाराविषयी दिलेल्या आपल्या 32 पानी माहितीमध्ये विषाणूचा हा प्रकार भारतीय असल्याचे म्हटलेले नाही. प्रत्यक्षात या अहवालात “भारतीय” हा शब्दच वापरलेला नाही.