पुणे: राज्यात दिव्यांग व्यक्तींसाठी हवे राजकीय आरक्षण – रफीक खान

पुणे, ४ जुलै २०२१: राजस्थान सरकारप्रमाणेच महाराष्ट्र राज्यातही दिव्यांग व्यक्तींसाठी राजकीय आरक्षण असले पाहिजे. राज्यात जवळजवळ ३० लाख दिव्यांग नागरिक आहेत, ज्यांना त्यांच्या समस्यांसाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी त्रास सहन करावा लागत आहे. म्हणूनच समाजातील या महत्वाच्या घटकाच्या विकासासाठी दिव्यांगांना राजकीय आरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणी दिव्यांग नागरिकांच्या प्रतिनिधींनी राजपाल भगतसिंह कोशयारी यांच्याकडे केली.

दिव्यांग नागरिकांचे प्रतिनिधी म्हणून रफीक खान, आकाश कुंभार, अभय पवार,भाग्यश्री मोरे आणि सुंदा बामणे यांनी राज्यपाल कोशयारी यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी त्यांनी वरील मागणीचे पत्र राज्यपालांना दिले.

याबाबत रफीक खान म्हणाले,”फक्त दिव्यांगांनाच दिव्यांगांचे दुःख आणि समस्या माहित आहेत. अर्थसंकल्पात आरक्षित केलेली आरक्षित रक्कम खर्च केली जाते परंतु योग्य नियोजन न केल्यामुळे अपंग नागरिकांना त्रास होत आहे. अशा वेळी दिव्यांग व्यक्तीना राजकीय प्रतिनिधित्व मिळाले, तर संपूर्ण आणि योग्य ठिकाणी वापर करता येईल.”

राज्यपालांनी हे प्रकरण अत्यंत काळजीपूर्वक ऐकले आणि माझ्या वतीने सरकारला निश्चितपणे अपंगांनाही राजकीय आरक्षण मिळावे आणि त्यांचाही प्रतिनिधी विधानसभेत घ्यावा अशी शिफारस करण्याचे अश्वासन राज्यपालांनी दिले असल्याचे खान यांनी संगितले.