यावर्षी देखील पायी वारी नाहीच: अजित पवार

पुणे,११जून२०२१: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्यातील कोरोना परिस्थिती चा आढावा घेतल्या नंतर पत्रकार परिषदेत माहिती दिली. आषाढी वारीच्या विषयावर चर्चा झाली तेव्हा देहू व आळंदी पालखी सोहळ्यासाठी फक्त १०० लोकांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच प्रत्येक पालखीला २ बसेस असे १० पालख्याना २० बसेस दिल्या जाणार आहे

पालखी सोहळा मागील वर्षी प्रमाणे बस मधूनच पंढरपूर कडे रवाना करण्यात येणार असून, लवकरच शासन या बद्दल आदेश जारी करेल.

कोरोना पार्श्वभूमीवर प्रत्येक पालखी सोबत फक्त ४० वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली असून या सर्वांची वैद्यकीय तपासणी बंधनकारक आहे .

पालखी प्रस्थान सोहळ्याला १०० वारकर्यांना परवानगी .

या सोबतच काला व रिंगण सोहळ्याला परवानगी देण्यात आल्याचे यावेळी सांगितले.

संत ज्ञानेश्वर महाराज ,संत तुकाराम महाराज ,संत नामदेव महाराज यांच्या सह एकूण १० मानाच्या पालखी सोहळ्यांचे आगमन पंढरपूरात, वाखरी ला वाहनाने पोहोचल्या नंतर तिथून पायी वारी करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे

पंढरपूर मंदिर हे दर्शनासाठी खुले करण्यात येणार नाही असे देखील उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितले