December 8, 2025

जुलै पर्यंत अतिरेकी कारवायांचा धोका – ज्योतिर्विद सिद्धेश्वर मारटकर यांचे भाकीत

पुणे, 24/04/2025: ‘एप्रिल २०२५ ते जुलै २०२५ मध्ये मंगळ-प्लूटो प्रतियोगामुळे देशावर आपत्ती,अतिरेकी कारवाया होण्याच्या शक्यता असल्याचे भाकीत मागील वर्षी २०२४ च्या दिवाळी अंकात केले होते’,असा दावा पुण्यातील ज्येष्ठ ज्योतिर्विद व ‘ज्योतिषज्ञान’ मासिकाचे संपादक सिध्देश्वर मारटकर यांनी केला आहे.अतिरेकीविरोधी कारवाईची तीव्रता ६ जून २०२५ पर्यंत राहील.जुलैपर्यंत अतिरेकी मारले जातील,असेही भाकीत त्यांनी वर्तवले आहे.सिद्धेश्वर मारटकर यांनी आज पुण्यात पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

ज्योतिषशास्त्रानुसार देशाची,प्रदेशाची कुंडली मांडून मारटकर यांनी हे भविष्य वर्तवले आहे.२०२४ च्या ‘ज्योतिष ज्ञान’ दिवाळी अंकात ते प्रसिद्ध झाले आहे. ‘पोलीस,मिलिटरीसाठी हा काळ प्रतिकूल ठरेल.गुन्हेगारी वाढीस लागेल.अतिरेकी कारवाया वाढतील.काश्मीर,उत्तर प्रदेश,दिल्ली याठिकाणी स्फोटक घटना संभवतात.शेजारील देशात अशांतता निदर्शनास येईल’,असे त्यांनी या अंकात लिहिले होते.

‘पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी कारवाईला प्रत्यूत्तर म्हणून भारताकडून मोठी कारवाई पाकिस्तानवर तसेच अतिरेक्यांच्या ठिकाणावर करण्याची शक्यता असून पाकिस्तानचे २ तुकडे होण्याची शक्यता वाटते’, असे मारटकर यांनी सांगितले संक्रमण पोर्णिमा,अमावस्या,कुंडलीनुसार देशाचे भविष्य घातपात,दुर्घटना,युद्ध यांचा विचार करता येतो आणि अंदाज बांधता येतो.दर वर्षी दिवाळी अंकात हे भविष्य वर्तवले जाते.मारटकर हे सामाजिक,राजकीय परिस्थितीचे भाकीत वर्तवत असतात.त्यांची क्रिकेट स्पर्धा,निवडणूक निकाल,दुर्घटना विषयक अनेक भाकिते यापूर्वी खरी ठरली आहेत.