जाब विचारल्यामुठे दोघांना जीवे मारण्याचा प्रयत्न तिघांना अटक

पुणे, दि.२५ मे २०२१: दगड मारल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरूणाचा गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न करणाया तिघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केले. ही घटना दोन दिवसांपुर्वी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास आंबेगाव खुर्द परिसरात घडली. सुमीत राजू अहिवळे (वय  २३), अक्षय किसन अंदारे (वय २५), नीलेश प्रल्हाद  शिंदे (वय २३, सर्व रा. आंबेगाव खुर्द )अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी केतन नरळे वय २१ यांनी तक्रार दिली आहे.

केतन वंदना दुध डेअरीसमोर साफ सफाई करीत असताना आरोपी अक्षय वंâदारे याने दगड मारला होता. त्याचा जाब विचारल्याचा राग आल्यामुळे आरोपींनी केतनला जीवे ठार मारण्याच्या हेतूने गळा दाबला. त्यानंतर केतनचा मावसभाउ  शंकर शिंदे यांच्या डोक्यात दगड मारून जखमी केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गोडसे तपास करीत आहेत.