वडगाव शेरीत तीन तडीपार गुंडाना अटक

पुणे, ३१ मे २०२१:  तडीपारीचा भंग करून वडगाव शेरी परिसरात वास्तव्य करीत असलेल्या तीन तडीपार गुंडाना गुन्हे शाखेच्या युनीट चारने अटक केले. त्यांच्याविरुद्ध चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीमा रमेश हातांगळे (वय ३५, रा. चंदननगर), प्रशांत रमेश हातांगळे (वय १९) आणि दिनेश चंद्रशेखर नायडू (वय ३४) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तीनही आरोपींना पुणे, पिंपरी चिचंवड आयुक्तालय आणि पुणे जिल्ह्यातून फेब्रुवारी महिन्यात दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते.

तडीपार आरोपी अस्तित्व लपवून चंदननगर परिसरात राहत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस अमंलदार सुरेंद्र साबळे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट चारचे पोलिस निरीक्षक अनिल शेवाळे यांच्या पथकाने तीनही आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांच्याकडे शहरात येण्यासाठी परवानगी नसल्याचे उघडकीस आले. त्यानंतर तिघांना अटक करण्यात आली. ही कामगिरी सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे, सहायक पोलीस निरीक्षक संदीप जमदाडे, सहायक पोलीस निरीक्षक शोभा क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील, सुरेंद्र साबळे, नागेश वुंâवर, शीतल शिंदे, दत्ता पुâलसुंदर, कौस्तुभ जाधव, स्वप्निल कांबळे, सोनम नेवसे, भाग्यश्री वाघमारे यांच्या पथकाने केली आहे.