पिंपरी चिंचवड मध्ये होणार झोपडपट्टींचे सुशोभीकरण

पिंपरी, १८/०१/२०२२: पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात मुख्य रस्त्याच्या कडेला अनेक झोपडपट्ट्या आहेत. तेथील झोपडपट्टी हे वेडी वाकडी पद्धतीने असल्यामुळे मुख्य रस्ते हे विद्रुप दिसतात. पिंपरी चिंचवड मधील नामवंत चित्रकार श्री.सुनिल शेगावकर यांच्या मार्फत झोपडपट्टीच्या दर्शनी भागावर काही सुशोभिकरणाच्या दृष्टीने बदल करण्यास व त्याप्रमाणे रंगरं

गोटी करण्याची मागणी शहर सुधारणा समितीचे सभापती श्रीमती अनुराधा गणपत गोरखे यांनी प्रशासनाकडे मागणी केली होती.

त्यानुसार शहरातील झोपडपट्ट्यांपैकी एक असणारे आण्णासाहेब मगर नगर झोपडपट्टीच्या दर्शनी भागावर प्रायोगिक तत्वावर सुशोभिकरण करण्याच्या दृष्टीने झोपडपट्टीच्या दर्शनी भागावर रंगरंगोटी करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे.