मुबारक अन्सारी
पुणे, दि. २५ मे २०२१: लॉकडाउनमध्ये जिल्ह्यातील विविध भागातील शेतकऱ्याचे ट्रॅक्टर चोरून विक्री करणाऱ्या चौघांच्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केले आहे. त्यांच्याकडून १० टॅक्टर, २ पिकअप, २ जीप, ६ दुचाकी, एटीएम मशीन फोडण्यासाठी लागणारे साहित्य, जनावरे असा मिळून ७७ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती पुणे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. त्यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषनचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे उपस्थित होते.
सतीश अशोक राक्षे (वय २८ रा. बेलवंडी, श्रीगोंदा), ज्ञानदेव उर्फ माऊली विनायक नाचबोणे (वय ३०, रा. शिरूर, मूळ- औसा लातूर), प्रविण कैलास कोरडे (वय २९ , रा. बोरी, जुन्नर) आणि सुनील उर्पâ भाउ बिभीषण देवकाते (वय ३१ रा. बार्शी, सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
शिरूर शहरात राहणारे सतीश राक्षे, ज्ञानेदव उर्फ माउली आणि प्रवीण कोरडे कामधंदा नसताना वेगवेगळे ट्रॅक्टर आणि इतर वाहने आणत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणला मिळाली होती. त्यानुसार पथकाने सतीश राक्षेला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने मेव्हणा प्रवीण कोरडे आणि साथीदार ज्ञानेश्वर उर्पâ माउली यांच्या मदतीने शिरूर, पारनेर, जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्याचे ट्रॅक्टर चोरल्याची कबुली दिली.
आरोपींनी शिरूर, आळेफाटा, नारायणगाव, खेड, यवत, मंचरमध्ये मिळून १२ गुन्हे केले आहेत. त्याशिवाय नगरमधील बेलवंडी आणि पारनेरमध्ये ८ तर सोलापूरमधील बार्शीत एक गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्याशिवाय आरोपींनी दुभती जनावरेदेखील चोरल्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते, पोलीस निरीक्षक पदमावर घनवट, सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे, दत्तात्रय गिरमकर उमाकांत वुंâजीर, जनार्दन शेळके , सचिन गायकवाड , दत्तात्रय तांबे, दिपक साबळे , राजू मोमीण, अजित भुजबळ , गुरु जाधव , मंगेश थिगळे , संदिप वारे , जितेंद्र मांडगे , अक्षय जावळे यांच्या पथकाने केली.
रस्त्यालगत असलेल्या ट्रॅक्टरचीच चोरी
मुख्य आरोपी सतीश राक्षे याने कर्ज काढून मोटार आणि पिकअप घेतले होते. मात्र, कर्जबाजारी झाल्यामुळे त्याने चोरी करण्याचा मार्ग निवडला. त्यासाठी त्याने दाजी प्रवीण कोरडे याची मदत घेतली. लॉकडाउनमध्ये दोघही मिळून चोरी करू लागले. त्यानंतर आरोपी ज्ञानेश्वर उर्फ माउली त्यांच्यासोबत चोरी करण्याचा साथीदार झाला. रस्त्यालगत शेतकऱ्यानी उभे केलेल्या टॅक्टरची रेकी आरोपी करीत होते. त्यानंतर रात्रीच्या सुमारास हेरलेला ट्रॅक्टर थोड्या अंतरावर लोटत नेउन चोरी केला जात होता.
ट्रॅक्टर पाहून शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी
कर्ज काढून घेतलेले ट्रॅक्टर चोरीला गेल्यामुळे शेतकऱ्याची कामे रखडली होती. मात्र, पुणे ग्रामीण पोलिसांनी ट्रॅक्टरचोर टोळीला पकडल्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आल्याचे दिसून आले. ट्रॅक्टरचा शोध घेतल्यामुळे शेतकरी सागर ताकवणे, अमोल भोसले, देवीदास मोरे, अरविंद येवले, अशोक गायकवाड, जयराम सोनवणे, विठ्ठल खनकर या शेतकऱ्यानी पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्यासह पथकाचा शाल देउन सन्मान केला.
More Stories
रोटरी क्लब ऑफ पुणे सिंहगड रोड’ च्या अध्यक्षपदी अमोल कागवडे ; पदग्रहण समारंभ संपन्न
मिळकतींची माहिती देताना लपवाछपवी
पुणे: डेक्कनमधील सराईत वर्षभरासाठी तडीपार