पुणे, २५ एप्रिल २०२५: पुणे-नगर महामार्गावर वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि वाहतुकीच्या सुरळीततेसाठी पुणे शहर वाहतूक पोलिसांनी खराडी आणि चंदननगर वाहतूक विभागांमध्ये तात्पुरत्या वाहतूक नियमनाचे आदेश जारी केले आहेत.
या नवीन वाहतूक नियोजनाचा मुख्य उद्देश टाटा गार्डरूम चौक आणि चंदननगर चौक येथील वाहतूक कोंडी कमी करणे आहे, जेथे मागील काही महिन्यांमध्ये वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले आहे.
पुणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपआयुक्त अमोल झेंडे यांनी याबाबतचे आदेश जाहीर केले असून, हे आदेश शनिवार, २६ एप्रिल २०२५ पासून लागू होतील. या नव्या उपाययोजनांच्या अंतर्गत, दोन्ही चौकांवरील सिग्नल तात्पुरते बंद करण्यात येतील, ज्यामुळे वाहतूक सुरळीतपणे सुरू राहील. यापूर्वी जारी केलेले सर्व वाहतूक आदेश रद्द करण्यात आले आहेत.
टाटा गार्डरूम चौक येथे वाहतूक वळण:
-पुणे कडून नगर कडे जाणारी लेन निरंतर चालू राहील.
-पुणे कडून जुना मुंढवा रोड (द्वारका गार्डन / साईनाथनगर) कडे जाणारी वाहतूक टाटा गार्डरूम चौक ओलांडून पुढे जाऊन डिव्हायडरमधून यु-टर्न घेऊन इच्छित स्थळी जाईल.
-जुना मुंढवा रोड कडून नगर (वाघोली कडे) जाणारी वाहतूक टाटा गार्डरूम चौकात डावीकडे वळून पुण्याच्या दिशेने जाऊन डिव्हायडरमधून यु-टर्न घेऊन इच्छित स्थळी जातील.
चंदननगर चौक येथे वाहतूक वळण:
-पुणे कडून नगर कडे जाणारी लेन निरंतर चालु राहील.
-पुणे कडून चंदननगर भाजी मार्केट कडे जाणाऱ्या वाहतुकेला चंदननगर चौकातून सरळ पुढे जाऊन डिव्हायडरमधून यु-टर्न घेऊन इच्छित स्थळी जावे.
-चंदननगर भाजी मार्केट कडून नगर (वाघोली) कडे जाणाऱ्या वाहतुकेला चंदननगर चौकात डावीकडे वळून पुण्याच्या दिशेने जाऊन डिव्हायडरमधून यु-टर्न घेऊन इच्छित स्थळी जावे.
वाहतूक पोलिसांनी प्रवाश्यांपासून सहकार्याची विनंती केली आहे, आणि त्यांनी हे बदल वाहतूक सुरळीत होण्यासाठी आणि रस्ता सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे.
More Stories
Pune: मेधा ताई तुमच्या बापाचा शनिवारवाडा नाही – रुपाली ठोंबरे पाटील
Pune: जैन बोर्डिंग जागा विक्रीव्यवहार प्रकरणाला जैसे थे ठेवण्याचे आदेश
Pune: पहिला ‘खासदार क्रीडा महोत्सव’ रंगणार २ ते १६ नोव्हेंबरदरम्यान