मुक्ता टिळक यांना स्मारकातून वाहणार श्रद्धांजली -चंद्रकांत पाटील

पुणे, ८ जानेवारी २०२३ : पुणे शहराच्या माजी महापौर व कसबा विधानसभा मतदारसंघाच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांची सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा संपन्न झाली यावेळी पुणे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ही घोषणा केली.

या श्रद्धांजली सभेला विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोर्हे,आमदार माधुरी मिसाळ,भीमराव तापकीर,चेतन तुपे,भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष जगदिश मुळीक, राष्ट्रवादीचे काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप ,काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, बाळासाहेबांची शिवसेनेचे नाना भानगिरे ,महाराष्ट्र नवं निर्माण सेनेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर ,बाबू वागस्कर,आरपीआय चे परशुराम वाडेकर ,अंकुश काकडे माजी आमदार मोहन जोशी ,माजी आमदार मेधा कुलकर्णी,प्रमोद कोंढरे,संदीप खर्डेकर यांच्यासह टिळक कुटुंबीय उपस्थित होते

यावेळी बोलताना पाटील म्हणाले की ,मुक्ताताई एक लढवय्या नेत्या होत्या त्यांनी दुर्धर आजाराशी झुंज दिली त्यांचे कार्य हे आदर्शवत आहे त्यांचे उचित असे स्मारक करणार असल्याची घोषणा या वेळी पाटील यांनी केली यावेळी सर्व पक्षातील नेते व समाजातील विविध मान्यवरांनी आमदार टिळक यांना श्रद्धांजली वाहिली