पुणे, १८/०३/२०२२: पहिल्या मेजर शशी चषक निमंत्रित जिल्हास्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेत ११ क्लब संघांनी सहभाग घेतला असून, स्पर्धेला १९ मार्चपासून सुरवात होईल. स्पर्धेतील सामने चिंचवडच्या शिवाजी उदय मंडळाच्या मैदानावर होतील.
या स्पर्धेचे आयोजन स्वर्गिय मेजर शशिधरन नायर यांच्या स्मरणार्थ अॅक्युमेन स्पोर्टस अकादमीने केले आहे. पूणे जिल्हा व्हॉलिबॉल संघटनेच्या मान्यतेनेच ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धा साखळी आणि बाद फेरी पद्धतीने खेळविली जाणार आहे.
सहभागी १२ संघांना चार गटात विभागण्यात आले आहे. गटातील अव्वल संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल. साखळी सामने शनिवारी आणि बाद फेरीचे सामने रविवारी खेळविण्यात येतील.
विजेत्या संघास रोख ११ हजार रुपयाचे पारितोषिक आणि चषक देण्यात येणार आहे. उपविजेता संघ वरोख ८ हजार रुपये आणि चषकाचा मानकरी होईल.
गटवारी –
अ गट – डेक्कन जिमखाना अ, एमव्हीएससी, बालेवाडी स्ट्रायकर्स
ब गट – डी डब्ल्यू स्पोर्टस, देहू इलेव्हन, नवजीवन स्पोर्टस फौंडेशन
क गट – एनडीए व्हॉलिबॉल, मवाल स्पायकर्स, खडकवासला व्हॉलिबॉल क्लब
ड गट – फत्तेचंद बॉईज, डेक्कन जिमखाना ब, सिटी प्राईड व्हॉलिबॉल क्लब
More Stories
पीएमडीटीए-महाराष्ट्र मंडळ ब्राँझ सिरिज 2023 टेनिस स्पर्धेत नीरज जोर्वेकर, रणवीर गुंड, आयुष कौशल यांचा दुस-या फेरीत प्रवेश
पुणे: दौंडमधील सामूहिक हत्याकांड प्रकरणात आरोपींनी वापरलेली वाहने जप्त, सामुहिक हत्याकांड प्रकरणात आरोपींची चौकशी सुरू
22व्या एनइसीसी डेक्कन आयटीएफ 40000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत तात्जाना मारिया व निगिना अब्दुरैमोवा यांच्यात अंतिम लढत