सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे दोन दिवसीय लेखापरीक्षण संपन्न, शैक्षणिक लेखापरीक्षणासोबतच तज्ज्ञांनी केले हेरिटेज वॉक

पुणे, दि.१४/११/२०२२- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अंतर्गत दोन दिवसीय शैक्षणिक लेखापरीक्षण बुधवारी पूर्ण झाले. यावेळी विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभागांना भेटी देत तज्ज्ञांकडून अहवाल सादर करण्यात आला. या परिक्षणासाठी आलेल्या तज्ज्ञांनी हेरिटेज वॉक चाही आनंद घेतला.

सार्वजनिक विद्यापीठ कायद्यातील तरतुदींनुसार प्रत्येक सार्वजनिक विद्यापीठाला तीन वर्षांतून एकदा शैक्षणिक लेखापरीक्षण करून घेणे आवश्यक असते. हे लेखापरीक्षण करण्यासाठी २१ तज्ज्ञांच्या गटाने विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभागांना भेटी देत माहिती घेतली. यावेळी परीक्षा, प्रवेश, विद्यापीठातील वसतिगृह, वित्त व लेखा विभाग, स्थावर विभाग आदी ठिकाणी भेट दिली. यावेळी तज्ज्ञांनी काही विद्यार्थ्यांशी देखील संवाद साधला.

यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे, प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे व कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षाचे संचालक डॉ.संजय ढोले यांनी विद्यापीठात घडणाऱ्या विविध शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची माहिती तज्ज्ञांना दिली.

परीक्षण अहवालाबाबत बोलताना डॉ. ढोले म्हणाले, तज्ज्ञांनी विभागांना भेटी देत त्यांचे चांगल्या बाबी तसेच सुधारणा करण्याच्या बाबी याची माहिती अहवालात सादर केली आहे. याचा एकत्रित अहवाल करत लवकरच तो कुलगुरूंना सादर केला जाईल. नॅक मुल्यांकनासाठी या परिक्षणाचा नक्कीच फायदा होईल.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे दोन दिवसीय लेखापरीक्षण संपन्न

शैक्षणिक लेखापरीक्षणासोबतच तज्ज्ञांनी केले हेरिटेज वॉक

पुणे, दि.१४- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अंतर्गत दोन दिवसीय शैक्षणिक लेखापरीक्षण बुधवारी पूर्ण झाले. यावेळी विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभागांना भेटी देत तज्ज्ञांकडून अहवाल सादर करण्यात आला. या परिक्षणासाठी आलेल्या तज्ज्ञांनी हेरिटेज वॉक चाही आनंद घेतला.