पुणे, ०४/११/२०२२: ‘दकनी अदब फाऊंडेशन’ तर्फे पुण्यात २६, २७ नोव्हेंबर रोजी ‘डेक्कन लिटरेचर फेस्टीव्हल’ चे आयोजन करण्यात आले आहे. साहित्य,कविता, नाट्य, चर्चा,संगीत अशा बहुरंगी,बहु आयामी कार्यक्रमांचे आयोजन या फेस्टीव्हलमध्ये केले जात आहे.फेस्टिव्हलचे हे तिसरे वर्ष आहे.’ डेक्कन लिटरेचर फेस्टिवल च्या मार्गदर्शक मोनिका सिंह , संचालक जयराम कुलकर्णी यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली.
बालगंधर्व रंगमंदिर येथे या फेस्टीव्हलचे विविध कार्यक्रम होतील. मान्यवरांच्या हस्ते २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता उद्घाटन कार्यक्रम होईल.शोभा डे,पद्मश्री मालिनी अवस्थी,अभिनेते मकरंद देशपांडे,अभिनेते-कवी पियुष मिश्रा,रिचा अनिरुद्ध,अभिनेत्री सोनाली कलकर्णी,कव्वाली गायिका नूरन भगिनी,वसीम बरेलवी,खुशबीर सिंह शाद,कुंवर रणजित सिंह चौहान,किशोर कदम(सौमित्र),मुक्ता बर्वे ,कविता काणे,सुधा मेनन असे ६३ हून अधिक कलाकार,साहित्यिक,गायक,पटकथा लेखक,कवी या फेस्टीव्हल मध्ये सहभागी होणार आहेत.
फेस्टीव्हल सर्वांसाठी खुला असला तरी प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी http://deccanliteraturefestival.org/ संकेत स्थळावर करावी लागणार आहे, अशी माहिती जयराम कुलकर्णी यांनी दिली.
More Stories
पुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन
चित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद
प्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा