थोक किंमत निर्देशांक (डब्ल्यू. पी. आय) वर दोन दिवसीय प्रशिक्षण आणि चर्चा सत्र पुण्यात आयोजित

पुणे, 09/10/2021: राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, फील्ड ऑपरेशन्स डिव्हिजन, प्रादेशिक कार्यालय, पुणे द्वारे विद्यमान मालिका (आधार वर्ष 2011-12) आणि नवीन मालिका (आधार वर्ष 2017-18) वरील घाऊक किंमत निर्देशांक (डब्ल्यू.पी.आय) वर दोन दिवसांचे प्रशिक्षण आणि चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते. प्रशिक्षण आणि चर्चा सत्र श्री आलोक कुमार, संचालक, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय फील्ड ऑपरेशन्स डिव्हिजन, प्रादेशिक कार्यालय, पुणे यांनी उद्घाटन केले. श्री अबू हुझैफा, उप संचालक, आर्थिक सल्लागार कार्यालय, उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभाग (DPIIT), वाणिज्य आणि उद्योग मंत्रालया ने प्रशिक्षण दिले. श्री शिर्के श्रीनिवास विजय, उप संचालक, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, फील्ड ऑपरेशन डिव्हिजन, क्षेत्रीय कार्यालय, पुणे उपस्थित होते. रायपूर, औरंगाबाद, नागपूर आणि पुणे क्षेत्रीय कार्यालयांचे 60 अधिकारी या प्रशिक्षणात सहभागी होत आहेत. या प्रशिक्षणात डब्ल्यू. पी. आय मध्ये वापरलेल्या संकल्पना आणि व्याख्या, डेटा संकलन आणि ऑनलाईन डब्ल्यू पी आय पोर्टल बद्दल चर्चा केली जाईल.

या प्रशिक्षणादरम्यान ऑनलाइन डब्ल्यूपीआय पोर्टलच्या प्रात्यक्षिकासह घाऊक किंमत निर्देशांक, डेटा संकलन आणि स्पेसिफिकेशन मार्गदर्शक तत्त्वांच्या संकल्पना आणि व्याख्यांवर सविस्तर चर्चा आणि क्षेत्र कार्याशी संबंधित प्रश्न या प्रशिक्षणादरम्यान केले जातील. डब्ल्यूपीआय हे सरकारी आणि खासगी संस्था आणि धोरणकर्त्यांनी वापरलेले एक प्रमुख व्यापक आर्थिक सूचक आहे, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या आर्थिक सल्लागार कार्यालय, उद्योग आणि अंतर्गत व्यापार विभाग (DPIIT) यांनी डब्ल्यू.पी.आयच्या बेस इयरमध्ये 2011-12 ते 2017-18 या काळात सुधारणा करण्याचा सराव सुरु केला आहे.