पुणे, दि. २६ (प्रतिनिधी) – जुन्या भांडणाच्या रागातून दोघा अल्पवयीनांनी तरूणावर वार करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना दोन दिवसांपुर्वी आंबेगाव खुर्दमध्ये घडली. याप्रकरणी अल्पवयीनांना भारती विद्यापीठ पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. रवींद्र राजेंद्र दिसले (वय १८) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मनीषा दिसले (रा. आंबेगाव खुर्द ) यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपुर्वी मनीषा यांचा मुलगा रवींद्र आणि त्याचे दोन मित्र आंबेगाव खुर्द परिसरातील ओढ्यात गप्पा मारत बसले होते. त्यावेळी तेथे आलेल्या दोघा अल्पवयीनांनी जुन्या भांडणाच्या रागातून रवींद्रवर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले आहे. याप्रकरणी आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक संगीता यादव यांनी दिली आहे.
More Stories
पुणे: सिव्हील सर्जनसह दोन वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
पुणे: उपायुक्तांकडे कोट्यावधीचे घबाड, एसीबीकडून दाम्पत्याविरूद्ध गुन्हा दाखल
पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी करण्याबाबत लवकरच निर्णय: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे