किरकोळ वादातून दोन सराईतांच्या गटात तुफान हाणामारी दोन तरूण जखमी, परस्परविरोधी तक्रारी दाखल

पुणे, दि. २३ मे 2021: किरकोळ कारणावरून दोन सराईतांच्या गटात झालेल्या वादानंतर झालेल्या मारहाणीत दोन तरूण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी दोन्ही गटाविरूद्ध खडक पोलिस ठाण्यात खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसNया गटातील तरूणांसोबत फिरत असल्याचा राग मनामध्ये धरून टोळक्याने तरूणावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास कासेवाडीतील भवानी पेठेत घडली. याप्रकरणी सराईत योगेश मारूती गायकवाड, विशाल मारूती गायकवाड, इटली उर्पâ अशोक गायकवाड, इशान शेख, सलीम (सर्व रा. कासेवाडी, भवानी पेठ) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आसिफ बाबुलाल शेख (वय २२) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गणेश माने तपास करीत आहेत.

जुन्या भांडणाच्या रागातून टोळक्याने तरूणावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले आहे. याप्रकरणी सराईत नझीर सलीम शेख, जिलानी सलीम शेख, इरफान पटेल, मुनीर गौस शेख (सर्व रा. कासेवाडी यांच्याविरूद्ध ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश मारूती गायकवाड (वय २५) यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक विक्रम मिसाळ तपास करीत आहेत