द इंडस आंत्रप्रेन्युअर्स तर्फे टायकॉन 2022 फ्युचर अचिव्हर्स कॉन्क्लेव्ह या परिषदेचे 11 व 12 नोव्हेंबर रोजी आयोजन

पुणे,9 नोव्हेंबर 2022 : द इंडस आंत्रप्रेन्युअर्स (टीआयई) पुणे तर्फे 11 व 12 नोव्हेंबर 2022 दरम्यान कॉनरॅड हॉटेल येथे टायकॉन 2022 फ्युचर अचिव्हर्स कॉन्क्लेव्ह या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. स्टार्टप क्षेत्रात एक नवा आदर्श ठेवण्यासाठी उद्योजकांना साहाय्य करणे हा त्यामागील प्रमुख उद्देश आहे,ही माहिती टीआयई तर्फे आयोजित पत्रकार परिषदेत टायकॉन पुणे 2022 चे अध्यक्ष गणेश नटराजन आणि टीआयई पुणे चे अध्यक्ष विनित पटनी यांनी दिली.11 नोव्हेंबर रोजी सकाळी 9:00 ते संध्याकाळी 7:30 तर 12 नोव्हेंबर रोजी सकाळी 9:00 ते सायंकाळी 4:30 दरम्यान ही परिषद संपन्न होईल.शुक्रवारी सायंकाळी 4.30 ते 5.30 दरम्यान उद्घाटन व बीजभाषणे होतील.यामध्ये पोलव्हॉल्टींग टू सक्सेस या विषयावर डॉ.रघुनाथ माशेलकर आणि स्टार्ट अ‍ॅन्ड स्केल या विषयावर हार्मोनिया होल्डींग्सच्या संस्थापिका पल्लबी साबू  ,व्हॉट इन्व्हेस्टर्स वाँट या विषयावर मल्टीपल्स ऑल्टरनेट अ‍ॅसेट मॅनेजमेंटच्या संस्थापिका रेणूका रामनाथ हे मार्गदर्शन करणार आहेत.

गणेश नटराजन म्हणाले की,11 व 12 नोव्हेंबर रोजी होणार्‍या फ्युचर अचिव्हर्स कॉन्क्लेव्हमध्ये यशस्वी उद्योजक हे व्यवसाय विकास व यश याबाबत नवउद्योजकांना मार्गदर्शन करतील.

झपाट्याने बदलणार्‍या तंत्रज्ञानामुळे नव्या आव्हानांबरोबरच स्टार्टप्सना नव्या संधी देखील निर्माण होतात. याबाबतची पुढची दिशा याबद्दल नंदन निलकेणी,डॉ.आर.एम.माशेलकर,भाविश अगरवाल (ओला) यासारखे व इतर दिग्गज नेतृत्व मार्गदर्शन करतील.

याशिवाय टीआयई पुणे आपल्या नर्चर उपक्रमामुळे ओळखली जाते. टीआयई पुणे नर्चर अ‍ॅक्सिलरेटर तर्फे व्हॅलिडेशन ऑफ अ‍ॅन आयडिया,स्केलिंग युवर कंपनी,ऑर्गनायझिंग युवर सेल्स टू ग्रो,फंडिंग,मार्केटिंग,सायबर सिक्युरिटी,डिझाईन थिंकींग,आर्टिफिशियल इंटेलिजन्स इत्यादी विषयांवर संस्थापकांसाठी मार्गदर्शन सत्रे (मास्टर क्लासेस) आयोजित करण्यात आली आहेत.

याप्रसंगी बोलताना टीआयईचे विश्‍वस्त किरण देशपांडे म्हणाले की, हे मास्टर क्लासेस स्टार्टप संस्थापकांसाठी अर्ध्या दिवसांच्या कार्यशाळेच्या रूपात आहेत.याचे वैशिष्ट्य म्हणजे या कार्यशाळा यशस्वी उद्योजकांतर्फे घेण्यात येतात.उदा.स्केलिंग अ‍ॅन्ड ग्रोईंग या विषयावर प्रख्यात कंपनी पर्सिस्टंट सिस्टिम्स प्रस्थापित करणारे आनंद देशपांडे हे मार्गदर्शन करतील,तर डिझाईन थिंकींग या विषयावर एलिफंड डिझाईनच्या आश्‍विनी देशपांडे व डिजिटल मार्केटिंग या विषयावर बॉम्बे शेव्हींग कंपनीचे संस्थापक शंतनू देशपांडे मार्गदर्शन करतील.

तंत्रज्ञान आणि वित्त क्षेत्रांशिवाय या परिषदेमध्ये विटिलिगोची (त्वचारोग) समस्या सोडविण्याचे उद्दिष्ट ठेऊन स्थापन झालेल्या अहाम्यून बायोसायन्सेस सारख्या शुध्द विज्ञानाचा वापर करून यशस्वी झालेल्या तरूण व्यवसायांचे सादरीकरण देखील होईल.

टीआयई पुणेचे अध्यक्ष विनित पटनी म्हणाले की,आम्ही नियमितरित्या महिला नेतृत्व असलेल्या कंपन्यांसाठी जागतिक स्पर्धा आयोजित करत असतो,त्यामुळे या परिषदेमध्ये महिला उद्योजकांवर देखील विशेष लक्ष केंद्रित केले जाईल.टायकॉन पुणे 2022 मध्ये अशा व्यवसायांमध्ये गुंतवणूक करणार्‍या जागतिक फंड असलेल्या स्ट्राँगहरच्या अंकिता वशिष्ठ मार्गदर्शन करतील.

विनित पटनी पुढे म्हणाले की,यावर्षी आमच्या प्रायोजकांमध्ये एनटीटी डाटा,जेटसिंथेसिस,आनंद राठी,फेअरफॅक्स कौंटी इकोनॉमिक डेव्हलपमेंट ऑथॉरिटी व स्टेट बँक ऑफ इंडिया यांचा समावेश असून फक्त प्रायोजकत्व नव्हे तर स्टार्टप समुदायाला साहाय्य करण्यासाठी देखील इच्छुक आहेत.

ग्राहकांना भेडसावणार्‍या जागतिक व्यवसाय आव्हानांवर उपाय शोधणार्‍या स्टार्टप्सना शोधून काढण्यासाठी एनटीटी डाटा ही टीआयई पुणे बरोबर काम करत आहे. जेटसिंथेसिस हे मेटावर्सवर लक्ष केंद्रित करत असून संबंधित क्षेत्रात सहयोगासाठी स्टार्टप्सची यादी निवडण्यास सांगितले आहे. फेअरफॅक्स कौंटी इकोनॉमिक डेव्हलपमेंट ऑथॉरिटी हे टीआयई पुणे ने निवडलेल्या कंपन्यांना युएसमध्ये विस्तारासाठी मदत करतील.स्टेट बँक ऑफ इंडियाने देखील स्टार्टअप समुदायावर लक्ष केंद्रित केले आहे.

द इंडस आंत्रप्रेन्युअर्स (टीआयई) ही ना नफा तत्त्वावर कार्यरत संस्था आहे.